मुंबई : आरोपी आणि पीडितेमध्ये परस्परसंमतीने शारीरिक संबंध प्रस्थापित झाले होते, असे निरीक्षण नोंदवून उच्च न्यायालयाने पोक्सोअंतर्गत अटकेत असलेल्या आरोपीला जामीन मंजूर केला.

घटनेदरम्यान पीडित मुलगी अल्पवयीन होती हे सिद्ध करण्यासाठी कोणतेही पुरावे, सामग्री सादर करण्यात आलेली नाही. तसेच, प्रकरणाचा बारकाईने अभ्यास केला असता आरोपी आणि पीडित दोघेही प्रेमसंबंधात होते. त्यातूनच त्यांच्यात परस्परसमंतीने शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. दोघेही ऑक्टोबर २०२३ ते जुलै २०२४ पर्यंत नातेसंबंधात होते. त्यानंतर, आरोपीने पीडितेला टाळण्यास सुरुवात केली. त्यामुळे, पीडितेने ऑगस्ट २०२४ मध्ये आरोपीविरोधात पोलिसांत बलात्काराची तक्रार नोंदवली. वैद्यकीय अहवालवगळता आरोपीविरोधात अन्य कोणताही पुरावा नसल्याचे, तसेच घटनेदरम्यान पीडिता ही अल्पवयीन असल्याचे कोणतेही पुरावे सादर केले नसल्याचा पुनरुच्चार करून न्यायमूर्ती आर. एन. लढ्ढा यांच्या एकलपीठाने आरोपीचा जामिनाची मागणी मान्य केली. दरम्यान, याचिकाकर्त्याने लग्नाचे आमिष दाखवून पीडितेसह अनेक वेळा शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप त्याच्यावर होता. दुसरीकडे, पीडितेशी लग्न करण्यास नकार दिल्याने आपल्याविरोधात तक्रार दाखल केली. तसेच घटनेच्या वेळी तिचे वय १७ वर्षे ९ महिने होते, असा दावा याचिकाकर्त्याने केला होता व जामिनाची मागणी केली होती.

Gujarat gold chain snatchers thieves active in vasai
गुजरातमधील सोनसाखळी चोर वसईत सक्रीय, गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून अटक
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Mokka crime fugitive arrested from Karnatak Pune news
Pune Crime News: मोक्काच्या गुन्ह्यातील फरारीला कर्नाटकातून अटक
loksatta editorial on india s relations with Sheikh Hasina
अग्रलेख : वंग(मैत्री)भंगाचे वास्तव…
fake police verification certificate, Anti-Terrorism Branch action, fake police verification certificate maker,
सावधान..! बनावट पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट बनवणाऱ्यांवर गुन्हा दाखल; दहशतवाद विरोधी शाखेची कारवाई
Supreme Court News
Supreme Court : कामाच्या ठिकाणी भेदभाव झाल्याचा ट्रान्सवुमन शिक्षिकेचा आरोप, सर्वोच्च न्यायालयाने याचिकेवरील निकाल ठेवला राखून
ghatkopar billboard collapse case, High Court,
घाटकोपर फलक दुर्घटना : आरोपी भावेश भिंडेचा जामीन रद्द करा, सत्र न्यायालयाच्या आदेशाला सरकारचे उच्च न्यायालयात आव्हान
Malkapur court sentenced accused to life imprisonment for sexually abusing minor girl and getting her pregnant
अल्पवयीन मुलीवर मातृत्व लादले ; आरोपीस जन्मठेप , डीएनए चाचणी निर्णायक

हेही वाचा – मुंबईत क्षयरोग प्रतिबंधात्मक प्रौढ बीसीजी लसीकरण, पहिल्याच दिवशी १ हजार ९९० नागरिकांचे लसीकरण पूर्ण

हेही वाचा – मुंबईच्या कमाल तापमानात घट

याचिकाकर्ता आणि पीडिता दोघेही परस्पर सहमतीने प्रेम संबंधात होते. परंतु, दोघांमध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित झाले तेव्हा पीडित मुलगी अल्पवयीन होती हे दाखवणारा कोणताही पुरावा सादर करण्यात आलेला नाही. तपासातूनही याचिकाकर्त्याविरोधात काहीही पुरावे सापडलेले नाहीत. याचिकाकर्ता तपासात सहकार्य करीत असून न्यायलयाच्या आदेशानुसार वैद्यकीय तपासणीसाठीही तो तयार असल्याचे त्याच्या वतीने न्यायालयाला सांगण्यात आले. तर, याचिकाकर्त्याने लग्नाचे खोटे आश्वासन देऊन अल्पवयीन पीडितेसह शारीरिक संबंध ठेवले. हा गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याचा दावा करून राज्य सरकारने याचिकाकर्त्याच्या जामीन देण्याच्या मागणीला विरोध केला.

Story img Loader