मुंबई : मंगलम ऑरगॅनिक्स लिमिटेडने दाखल केलेल्या व्यापारचिन्ह हक्क (ट्रेडमार्क) उल्लंघनाप्रकरणी उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशाचे पालन न करणे पतंजली आयुर्वेद लिमिटेडला भोवले आहे. कापूर उत्पादन विक्रीस प्रतिबंध करणाऱ्या अंतरिम आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी न्यायालयाने कंपनीला ५० लाख रुपये एका आठवड्यात जमा करण्याचे आदेश दिले आहेत.

पतंजलीकडून ३० ऑगस्ट २०२३ रोजी देण्यात आलेल्या मनाई आदेशाचा सतत भंग केला जात आहे. मात्र, आपल्या आदेशाचे अशाप्रकारे सतत उल्लंघन केले जाणे न्यायालय सहन करणार नाही. त्यामुळे, अवमान याचिकेवर अंतिम आदेश देण्यापूर्वी पतंजलीने न्यायालयात ५० लाख रुपये जमा करावेत, असे आदेश न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या एकलपीठाने दिले. मंगलम ऑरगॅनिक्सने पतंजलीविरुद्ध न्यायालयात धाव घेतली होती व त्यांच्या कापूर उत्पादनांच्या स्वामित्व हक्कांचे उल्लंघन केल्याचा दावा केला होता. न्यायालयाने या दाव्याची दखल घेऊन ३० ऑगस्ट २०२३ रोजी पतंजलीला कापूर उत्पादने विकण्यास मनाई केली. मात्र, त्यानंतरही पतंजलीकडून कापूर उत्पादनांची विक्री सुरू आहे, असा दावा करून मंगलम ऑरगॅनिक्सने पुन्हा एकदा उच्च न्यायालयात धाव घेतली. तसेच, पतंजलीविरोधात अवमान याचिका दाखल केली. त्यानंतर, पतंजलीने २ जून रोजी प्रतिज्ञापत्र दाखल करून न्यायालयाची माफी मागितली आणि न्यायालयाच्या आदेशांचे पालन करण्याचे आश्वासन दिले. तथापि, पतंजली आयुर्वेदाचे संचालक रजनीश मिश्रा यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात कंपनीने न्यायालयाच्या अंतरिम आदेशाचे उल्लंघन केल्याची बाब कबूल केली.

The Golden Road: How Ancient India
China Silk Road weapon: चीनकडून ‘सिल्क रोड’ या ऐतिहासिक संकल्पनेचा शस्त्रासारखा वापर; भारतीय इतिहासकार कुठे चुकले?
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
what is fiscal deficit
UPSC-MPSC : अर्थशास्त्र : वित्तीय तुटीच्या संकल्पना
irs officer
आयआरएस अधिकारी अनुसूया झाली अनुकाथिर सूर्या; महिला आयआरएस अधिकार्‍याने लिंग बदलून कसा रचला इतिहास?
swiggy IPO, share market,
विश्लेषण : ‘स्विगी’च्या समभागांसाठी बोली लावणे फायद्याचे की तोट्याचे?
maori leader protest in newzealand
विधेयकाचा निषेध म्हणून महिला खासदाराचा ‘वॉर डान्स’; कुठल्या देशाच्या संसदेत घडला हा प्रकार?
Loksatta savidhanbhan B N Rao had started the work of drafting the constitution
संविधानभान: नव्या संविधानाची चौकट साकारणारे हात..
Indian Army recruitment 2023 Apply for 194 SSC technical course
Indian Army Recruitment 2023: भारतीय लष्करात १९४ पदांसाठी होणार भरती, अर्जाची शेवटची तारीख, पात्रता, जाणून घ्या

हेही वाचा – मराठा आरक्षणाची अंतिम सुनावणी ५ ऑगस्टपासून सुरू

हेही वाचा – ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा : अकरा हजार कोटींवरून अठरा हजारांवर गेलेल्या प्रकल्पाचे पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन

न्यायालयाच्या मनाई आदेशानंतर ४९,५७,८६१ रुपयांचे कापूर उत्पादने विकली गेली. तसेच, २५,९४,५०५ रुपये किमतीची कापूर उत्पादने अद्याप घाऊक विक्रेते किंवा वितरक आणि अधिकृत दुकानांत पडून आहेत. तसेच, ती संबंधित ठिकाणी ठेवण्यात आल्याचेही पतंजलीने प्रतिज्ञापत्राद्वारे मान्य केले. आदेशाचे उल्लंघन केल्याच्या पतंजलीच्या कबुलीची न्यायालयाने दखल घेतली. तसेच, पतंजलीने आदेशानंतर आणि अलीकडे, ८ जुलै रोजी कापूर विकला. शिवाय, कंपनीच्या संकेतस्थळावरूनही कापूर उत्पादन विक्रीसाठी सूचीबद्ध करण्यात आल्याचे म्हटले. त्यामुळे, मनाई आदेशाचा अवमान झाला असून पतंजलीने न्यायालयात ५० लाख रुपये जमा करावेत, असा आदेश न्यायालयाने दिला.