संजय लीला भन्साळी दिग्दर्शित बाजीराव-मस्तानी या चित्रपटातील पिंगा आणि मल्हारी या दोन वादग्रस्त गाण्यांवर तात्काळ बंदी घालण्यास मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला. याप्रकरणी संजय लीला भन्साळी यांनी आपली बाजू मांडावी, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. आजच हा चित्रपट देशातील सर्व चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला.
हेमंत पाटील यांनी बाजीराव-मस्तानीमधील पिंगा आणि मल्हारी या गाण्यांवर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली होती. या दोन्ही गाण्यांमध्ये इतिहासाची मोडतोड करण्यात आली असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यामुळे चित्रपटात ही गाणी दाखविण्यात येऊ नये, अशी मागणी त्यांनी केली होती. त्यावर न्यायालयाने संजय लीला भन्साळी यांना त्यांची बाजू मांडण्याचे निर्देश दिले. सध्यातरी या गाण्यांवर बंदी घालण्यास न्यायालयाने नकार दिला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा