मतदारांनी मोठय़ा संख्येने मतदानप्रक्रियेत सहभागी व्हावे यासाठी निवडणूक आयोग जिवाचे रान करत असतानाच सातत्याने व्यवस्थेविरोधात बोटे मोडणाऱ्या ‘मेणबत्ती संप्रदायी’ उच्चभ्रू मतदारांनी मात्र मतदानाकडे पाठ फिरवण्याची तजवीज आधीच करून ठेवली असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. राज्यात १०, १७ व २४ एप्रिलला मतदान होत असताना नेमक्या याच काळात अनेकांनी उन्हाळी सुटीची मजा लुटण्यासाठी सहलीला जाण्याला प्राधान्य दिले आहे. विशेष म्हणजे पर्यटन कंपन्यांनीही पाच ते २० हजार रुपयांपर्यंत घसघशीत सवलती जाहीर करून या मतदारांना सहलीवरच शिक्का मारण्यास उद्युक्त केले आहे!
एरव्ही व्यवस्थेविरोधात कंठशोष करणाऱ्या आणि ऊठसूट मेणबत्त्या पेटवून व्यवस्थेविरोधात मोर्चा काढणाऱ्या उच्चभ्रू वर्गातील अनेक मतदार राजांनी उन्हाळी सुटय़ांमधील सहलींचे आरक्षण चार ते पाच महिन्यांआधीच केल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र, दोन आठवडय़ांपूर्वी सार्वत्रिक निवडणुकांची तारीख जाहीर झाल्यामुळे या मतदारांची आणि पर्यटन कंपन्यांची चांगलीच पंचाईत झाली आहे. मतदानाच्या दिवशी आपल्या शहरात उपस्थित राहायचे म्हटले, तर काही हजारांचा फटका सहन करून सहल रद्द करावी लागणार असल्याने मतदारांनी सहलीला जाणेच पसंत केले आहे.
आपल्या सहलीचे नियोजन आयत्या वेळी करणाऱ्यांनाही निवडणुकीच्या तारखांनी चांगलेच पेचात टाकले आहे. मतमोजणी होऊन निकाल लागल्यानंतर सहलीला जायचे म्हटले, तर मुलांचे क्लास, शाळा-महाविद्यालय प्रवेश या भानगडी सुरू होत असल्याने एप्रिलच्या मध्यावर सहलीसाठी जाण्याचे बेत आखले होते. मात्र, त्याचवेळी निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या. विशेष म्हणजे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी यात्रा कंपन्यांनीही किमान पाच ते कमाल २० हजार एवढी घसघशीत सूट देऊ केली आहे. त्यामुळे ही सूट घ्यावी की, मतदानासाठी थांबावे, हा पेच मतदारांना पडला आहे. ‘केसरी टूर्स’नेही आयत्या वेळच्या सहल आरक्षणांवर मोठी सूट दिली आहे.
सहलीवरच शिक्का!
मतदारांनी मोठय़ा संख्येने मतदानप्रक्रियेत सहभागी व्हावे यासाठी निवडणूक आयोग जिवाचे रान करत असतानाच सातत्याने व्यवस्थेविरोधात बोटे मोडणाऱ्या ‘मेणबत्ती संप्रदायी’ उच्चभ्रू मतदारांनी मात्र मतदानाकडे पाठ फिरवण्याची तजवीज आधीच करून ठेवली असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 26-03-2014 at 04:13 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: High profile voters preference for tourism on election day