मुंबई : खार लिकिंग रोड येथे भरधाव वेगाने मोटार चालवित तिघांना जखमी केल्याची घटना घडली. पोलिसांनी आरोपीला थांबवण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने पोलिसांच्या अंगावरही गाडी घालण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी आरोपी हितेन देसाई (५३) याला अटक केली असून दारूच्या अंमलाखाली तो मोटरगाडी चालवत असल्याचा संशय आहे.

वांद्रे पूर्व येथे राहणाऱ्या धनश्री गणतांडेल (३६) या १६ जूनला लिंकिंग रोड येथे बहीण सरोज सिंहबरोबर कपडे खरेदीसाठी गेल्या होत्या. तेथे मोटरगाडी चालकाने तक्रारदार धनश्री यांच्या अंगावरून मोटरगाडी नेण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांच्या डाव्या हाताला दुखापत झाली. त्यापूर्वी मोटरगाडीने एका दुचाकीला धडक दिली होती.

Pune Loot, bikers robbed pune, pune crime news,
पुणे : शहरात लुटमारीचे प्रकार वाढीस, दुचाकीस्वार तरुणांना लुटले
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Khed Parshuram Ghat accident, Khed Parshuram Ghat,
खेड परशुराम घाटात दाट धुक्यामुळे चार वाहनांचा विचित्र अपघात; वाहनांचे मोठे नुकसान तर जीवितहानी टळली
minor boy stabbed his mother
कोवळ्या वयात एवढा राग…मुंबईत अल्पवयीन मुलाकडून आईवर चाकूने हल्ला, महिलेवर शीव रुग्णालयात उपचार सुरू
Mumbai police absconded
मुंबई: १९ वर्षांपासून फरार आरोपी आरोपीला अखेर पकडले
vegetable vendor Murder, Murder at Mira Road,
मिरा रोड येथे भाजी विक्रेत्याची गळा चिरून हत्या
sushma andhare
Sushma Andhare: ‘केलंय काम भारी’वरून अंधारेंचा हल्लाबोल, अंबरनाथच्या सभेत आमदार किणीकरांसह शिंदे गटातील गटबाजीवरही बोट
Sadabhau Khot allegations
“…तेव्हा माझा एन्काऊंटर करण्याचा डाव होता”, सदाभाऊ खोत यांचा खळबळजनक आरोप!

हेही वाचा…विशाळगड येथे बकरी-ईद, उरूसनिमित्त कुर्बानीस परवानगी, आदेशाचा विपर्यास केल्यावरून उच्च न्यायालयाकडून स्थानिक प्रशासनाची कानउघाडणी

पोलिसांनी गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने मोटरगाडी भरधाव चालवून नागरिकांना धडक दिली. त्यावेळी गाडीच्या काचाही फुटल्या. तर दुसऱ्या एका पोलीस हवालदाराने मोटर अडवण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने त्यांच्या अंगावरही गाडी घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे घाबरून ते बाजूला सरकले. शेवटी पाली हिल येथे पोलिसांनी मोटरगाडी अडविली. आरोपी देसाई नामांकित कंपनीत उच्च पदावर कार्यरत आहे.