राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या गाडीला अपघात (Uday Samant car accident) झाल्याची घटना घडली आहे. आज (१ डिसेंबर) रात्री ८ वाजता मुंबईमध्ये कार्यक्रमाला जात असताना हा अपघात झाला. उदय सामंत यांच्या विशेष सुरक्षा पथकातील (Special security unit) गाडीचा ब्रेक फेल झाल्यानंतर ही गाडी उदय सामंत यांच्या गाडीवर आदळली. या अपघातात उदय सामंत यांना मुका मार लागला असून ते सुरक्षित आहेत. यावेळी या गाडीत उदय सामंत एकटेच होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

गाडीचे ब्रेक फेल होऊन झालेल्या या अपघातात उदय सामंत यांचे सुरक्षा अधिकारी जखमी झाले आहेत. त्यांना मुंबईतील कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. संरक्षण करणाऱ्या सर्वांचा औषधोपचाराचा खर्च उदय सामंत करणार आहे.

हेही वाचा : आळंदीला चाललेल्या पायी दिंडीत पिकअप शिरल्याने अपघात; ४ वारकऱ्यांचा मृत्यू, ३० जण जखमी

दरम्यान, या अपघातात गाड्या एकमेकांवर आदळल्यानं गाड्यांचं काही प्रमाणात नुकसान झालं आहे.