कर्नाटकामध्ये महाविद्यालयांमध्ये हिजाब घालवण्यावरुन सुरु असलेल्या वादावर देशभरात आंदोलने करण्यात येत आहेत. या प्रकरणावरून महाराष्ट्रातही काही ठिकाणी हिजाब घालण्याचं समर्थन करत आंदोलने करण्यात येत आहेत. राज्य सरकारही हिजाबवरुन सुरु असलेल्या वादावर नजर ठेवून आहे. मात्र मुंबईच्या एका महाविद्यालयामध्ये हिजाब, स्कार्फ घालण्यावर बंदी आहे. मुंबईतील एमएमपी शाह कॉलेजमध्ये हिजाब, स्कार्फ किंवा घुंगटला बंदी असल्याचे महाविद्यालयाच्या प्रॉस्पेक्टसमध्ये म्हटले आहे.

मुंबईतील एसएनडीटी विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या माटुंगा येथील एमएमपी शाह कॉलेजमध्ये हिजाब, स्कार्फ आणि बुरखा घालून कॉलेजमध्ये बसण्याला बंदी आहे. महाविद्यालयाच्या नियमावली पुस्तिकेत यासंदर्भात उल्लेख करण्यात आला आहे. महाविद्यालयाची प्रतिष्ठा राखण्यासाठी विद्यार्थ्यांनी योग्य कपडे परिधान करावेत. कॉलेजच्या आवारात बुरखा/घुंगट किंवा स्कार्फ घालण्यास सक्त मनाई आहे, असे कॉलेजने म्हटले आहे.

Ajit Pawar on Yogi Adityanath
योगी आदित्यनाथांमुळे अजित पवारांची गोची; मोदी-शाहांची एकही सभा नाही; अस्तित्वाची लढाई राष्ट्रवादी कशी लढणार?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Sharad Pawar Dhananjay Munde
Sharad Pawar : “सत्ता फार लवकर डोक्यात गेली”, शरद पवारांचा धनंजय मुंडेंना टोला; म्हणाले, “अडचणींच्या काळात…”
Sharad Pawar
Sharad Pawar : मविआचा मुख्यमंत्रिपदाबाबत काय निर्णय झालाय? शरद पवार सस्पेन्स मिटवत म्हणाले…
sushma andhare
Sushma Andhare: ‘केलंय काम भारी’वरून अंधारेंचा हल्लाबोल, अंबरनाथच्या सभेत आमदार किणीकरांसह शिंदे गटातील गटबाजीवरही बोट
Advice from Uttar Pradesh State Commission for Women to male tailors
‘पुरुष शिंप्यांनी महिलांचे माप घेऊ नये’ ; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाचा सल्ला
Sanjay raut Maharashtra unsafe
Sanjay Raut: “मोदी जेव्हा येतात, तेव्हा महाराष्ट्र असुरक्षित”, संजय राऊत यांची टीका
maharashtra assembly election 2024 chief minister eknath shinde criticizes on manifesto of maha vikas aghadi
”महाविकास आघाडीचा जाहीरनामा ही पंचसूत्री नसून थापासुत्री”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका!

“आमच्या कॉलेजच्या प्रॉस्पेक्टसमध्ये असे लिहिलेल आहे. पूर्वी मुले अशा प्रकारचे कपडे घालून मुलींना त्रास देत होती. ते लक्षात आल्यानंतर मुलींच्या सुरक्षिततेसाठी आम्ही हा नियम लागू केला आहे. या नियमानुसार आम्ही मुलींना वर्गामध्ये बुरखा किंवा घुंगट काढून ठेवण्यास सांगतो. यामागे विद्यार्थ्यांची सुरक्षा हाच मुद्दा आहे. आमच्याकडे मुलींना प्रवेश देताना कोणत्याही धर्म किंवा जातीचा विचार केला जात नाही. सर्व मुलींनी एकसारखे राहून शिक्षण घ्यावे म्हणून बुरखा काढून टाकण्यास सांगितले जाते,” अशी प्रतिक्रिया एमएमपी शाह महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. लीना राजे यांनी लोकसत्ता डॉट कॉमशी बोलताना दिली.

आम्ही कुठल्याही मुलीला बुरख्यावरुन अडवलेले नाही. वर्गात इतर मुलींना चेहरा दिसण्यासाठी बुरखा काढून ठेवा आणि जाताना तो घाला असे आम्ही सांगितले आहे. आम्हाला प्रत्येक धर्माचा आदर आहे, असे प्राचार्या डॉ. लीना राजे म्हणाल्या.

Hijab Row : “गणवेश असेल तर त्याचे..”; हिजाब घालण्याच्या वादावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

शैक्षणिक संस्थाचे नियम असतील सर्वांनी पाळले पाहिजेत – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

राज्यातही हिजाब प्रकरणाचे पडसाद उमटल्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी याप्रकरणी भाष्य केले आहे. “आपण शाळेत, कॉलेजमध्ये जातो तेव्हा शिक्षणालाच प्राधान्य दिले पाहिजे. शैक्षणिक संस्थाचे जे नियम असतील ते सर्वांनी पाळले पाहिजेत. माझी सगळ्यांना विनंती आहे की दुसऱ्या राज्यामध्ये घडणऱ्या एखाद्या घटनेवरुन महाराष्ट्रात आंदोलन करुन समाजात अशांतता निर्माण करणे राज्याच्या हिताचे नाही. राजकीय फायद्यासाठी अशा प्रकारचे आंदोलन करणे योग्य नाही. मी सर्वांना आवाहन करतो की शांतता ठेवण्यासाठी प्रयत्न करावा,” असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले आहे.

हिजाबवरुन सुरु असलेल्या वादात मलालाची उडी; भारतीय नेत्यांना केले आवाहन

शैक्षणिक संस्थांमधील हिजाबवरील बंदी प्रकरण बुधवारी कर्नाटक उच्च न्यायालयाच्या व्यापक खंडपीठाकडे पाठवण्यात आले आहे.  त्यावर गुरुवारी सुनावणी होणार आहे. दुसरीकडे, हिजाबवरून शैक्षणिक संस्थांमध्ये तणाव कायम असल्याने पोलिसांनी बंगळुरुमधील शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात दोन आठवडे आंदोलनबंदी लागू केली आहे.

दरम्यान, बंगळुरुतील शाळा, महाविद्यालये आणि अन्य शैक्षणिक संस्थांच्या प्रवेशद्वारापासून २०० मीटरच्या आवारात आंदोलनास पोलिसांनी बंदी घातली आहे. दोन आठवडे ही बंदी लागू राहील. हिजाब प्रकरण चिघळल्याने राज्यातील शाळा-महाविद्यालये तीन दिवस बंद असून, बहुतांश ठिकाणी ऑनलाइन वर्ग सुरु आहेत.