मोबाइल फोन करणे महागले * पल्स रेट ९० ऐवजी ६० सेकंदांवर
फोनवरील विविध सुविधांची मोठमोठय़ा जाहिरातींद्वारे माहिती देणाऱ्या ‘महानगर टेलिफोन निगम’ने आपल्या पल्स रेटमध्ये कपात करण्याबाबतचा निर्णय मात्र गुपचूप घेतला आहे. या निर्णयामुळे आता लँडलाइनवरून मोबाइल क्रमांक लावणे तसेच कंपन्यांच्या लँडलाइनशी, गरुडा सेवेशी बोलणे महाग झाले आहे. २ नोव्हेंबरपासूनच हे बदल झाले असून देयकांमध्ये ही वाढ दिसून येणार आहे.
या निर्णयानुसार लँडलाइनवरून इतर मोबाइल नेटवर्कवर केलेल्या दूरध्वनीच्या कॉलचा पल्स दर पूर्वी ९० सेकंद होता. तो आता ६० सेकंद करण्यात आला आहे. तर इंट्रा सर्कल कॉल (५० किमीपर्यंत) अंतर्गत इतर कंपनीच्या लँडलाइनवर तसेच गरुडा सेवेवर केलेल्या कॉलचा पल्स दर पूर्वीच्या १२० सेकंदऐवजी ६० सेकंद करण्यात आला आहे. त्यामुळे एमटीएनएलव्यतिरिक्त दुसऱ्या मोबाइल सेवाधारकाच्या संपर्काचा दर पूर्वीपेक्षा दीडपट तर अन्य लँडलाइन सेवाधारकाशी आणि गरुडासेवेशी संपर्काचा दर दुप्पट झाला आहे.
या प्रकरणी ३ नोव्हेंबरच्या वृत्तपत्रात छोटी जाहिरात देऊन एमटीएनएलने ही दरवाढ लागू केली आहे. याबाबत अधिक माहितीसाठी वेबसाइटवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले असले तरी प्रत्यक्षात वेबसाइटवर हा बदल आढळून येत नाही. पूर्वीचाच दर लागू असल्याचे दिसून येते. ही ग्राहकांची दिशाभूल असल्याची प्रतिक्रिया मुंबई ग्राहक पंचायतीच्या कार्यवाह अनिता खानोलकर यांनी दिली आहे.
‘एमटीएनएल’ची छुपी लँडलाइन दरवाढ
फोनवरील विविध सुविधांची मोठमोठय़ा जाहिरातींद्वारे माहिती देणाऱ्या ‘महानगर टेलिफोन निगम’ने आपल्या पल्स रेटमध्ये कपात करण्याबाबतचा निर्णय मात्र गुपचूप घेतला आहे. या निर्णयामुळे आता लँडलाइनवरून मोबाइल क्रमांक लावणे तसेच कंपन्यांच्या लँडलाइनशी, गरुडा सेवेशी बोलणे महाग झाले आहे.
First published on: 07-11-2012 at 04:54 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hike in mtnl call rate