Himalayan Vulture Rescued in Uran: उरण जवळील एका गावात जखमी अवस्थेत आढळलेल्या, अशक्त हिमालयीन गिधाडाची सुटका करण्यात आली आहे. दरम्यान, उरणच्या वन विभागाने त्याला वैद्यकीय उपचारांसाठी ‘रेस्क्युइंग असोसिएशन फॉर वेल्फेअर’(रॉ) या संस्थेकडे सुपूर्द केले आहे. उरण येथील एका गावात गुरुवारी निर्जलित आणि कुपोषित अवस्थेतील एक लहान हिमालयीन गिधाड फ्रेंड्स ऑफ नेचर या संस्थेच्या सदस्यांना आढळले. त्यांनी याबाबत वन विभागाला माहिती देताच घटनास्थळी वन विभागाचे कार्यकारी दाखल झाले. प्रथमदर्शनी गिधाड निर्जलीकरणामुळे अशक्त झाल्याचे दिसून आले. त्यानंतर ते कुपोषित असल्याचेही लक्षात आले. गिधाडाच्या पुढील वैद्यकीय उपचारांसाठी तसेच पुनर्वसनासाठी वन विभागाने त्याला रॉ या संस्थेकडे सुपूर्द केले आहे. सध्या त्याच्यावर रॉ संस्थेच्या पशुवैद्यकीय चमुद्वारे उपचार सुरु करण्यात आले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : रखडलेली पशुगना ४२ टक्क्यांवर; जाणून घ्या आढावा बैठकीत सचिवांनी काय आदेश दिले

दरम्यान, निसर्गाच्या अन्नसाखळीतला गिधाड अत्यंत महत्त्वाचा, स्वच्छता राखणारा घटक आहे. मात्र, हा पक्षी आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने(बीएमएचएस) गिधाडाच्या संवर्धनासाठी पावले उचलली आहेत. बीएनएचएसच्या हरियाणा, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश आणि आसाम या चार राज्यांत प्रजनन केंद्रे आहेत. सोसायटीने २००४ पासून गिधाडांच्या कृत्रिम प्रजननाचे काम सुरु केले आहे. हिमालयीन गिधाड हे अफगाणिस्तान, कझाकस्तान, किर्गीस्तान, उझबेकीस्थान, ताजिकिस्तान, तिबेट, नेपाळ, चीनचा पश्चिम भाग, मंगोलिया या भागांत आढळते. तसेच इशान्य भारतातही ते आढळते. थंडीच्या हंगामात हे पक्षी दक्षिणेकडे स्थलांतर करतात.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Himalayan vulture rescued in uran navi mumbai css