गणेशोत्सव असो की दिवाळीचा सण कपडय़ांच्या खरेदीसाठी मुंबईत बाजारांची कमी नाही. मात्र काही बाजार हे तिथे मिळणाऱ्या कपडय़ांपेक्षाही तेथील वातावरण, दुकानदार, ग्राहक यांच्यामुळे अधिक जवळचे वाटतात. आणि काहीसे लांब असले तरी अशा बाजाराकडेच कायम पावले वळतात. दादर स्थानकापासून काही अंतरावर असलेल्या हिंदमाता या बाजाराचेही हेच वैशिष्टय़ आहे. भरजरी शालू, पैठणी, बांधणी, ड्रेसच्या कापडापासून ते अगदी टॉवेल, मॅचिंग सेंटपर्यंत सर्वच या बाजारात उपलब्ध आहे. मुंबईच्या मध्यवर्ती असल्याने उपनगरातील ग्राहकही सण-उत्सवांच्या खरेदीसाठी आवर्जून या बाजारात येतात.

लालबागपासून साधारण दोन किलोमीटरवर सुरू असलेल्या हिंदमाता या बाजाराला ६० वर्षांहून जास्त काळ झाला आहे. या परिसरातील हिंदमाता हे चित्रपटगृह साधारण १९१३ च्या सुमारास सुरू झाले होते. येथे अनेक मूकपटही दाखविण्यात आले असून चित्रपटगृहावरूनच या बाजाराला हिंदमाता हे नाव पडले असावे. हा बाजार पश्चिम व मध्य रेल्वेला जोडणाऱ्या दादर या मध्यवर्ती स्थानकाजवळ असल्याने या बाजाराला उपनगरातीलही ग्राहक मोठय़ा संख्येने येतात. या बाजारात किरकोळ व घाऊक अशा दोन्ही स्वरूपात विक्री होत असल्याने लग्नसमारंभ, सण-उत्सव किंवा जास्त संख्येने कपडे खरेदी करावयाचे असल्यास हा बाजार उपयुक्त ठरतो. सुरुवातीच्या काळात हा बाजार प्रामुख्याने लग्नसमारंभातील खरेदीसाठी ओळखला जात होता. मराठमोळ्या लग्नांमध्ये बस्त्याची पद्धत असते. या पद्धतीनुसार लग्नाला उपस्थित असलेल्यांना साडी भेट म्हणून दिली जाते. डझनवारी घेतल्या जाणाऱ्या साडय़ांच्या किमती अगदी १०० ते १५० रुपयांपासून सुरू होतात. त्यामुळे लग्नसमारंभाच्या काळात या दुकानांबाहेर लांबच्या लांब रांग दिसते. महत्त्वाचे म्हणजे या लग्नाच्या बस्त्यासाठी दोघा-तिघांनी जाण्याची पद्धत नसल्याने अगदी काका, मामांपासून सर्व गोतावळा खरेदी करण्यासाठी दुकानाबाहेर रांग लावून उभा असतो. आजही हिंदमाताच्या या बाजारात पारंपरिक पद्धतीने लग्नाची खरेदी करणाऱ्यांची गर्दी दिसते हे विशेष. बस्ता खरेदी करण्याची पद्धत मोठी रंजक असते. दादर स्थानकावर सर्व कुटुंबीयांनी जमल्यानंतर कुठल्या दुकानात जायचे हे कुटुंबातील थोर मंडळी ठरवितात. आणि त्यांच्या म्हणण्यानुसार दुकानात शिरल्यानंतर पहिली खरेदी वर-वधूच्या कपडय़ांची होते. या कपडय़ांची निवड मात्र थोरल्यांच्याच आदेशावरून होते. अनेकांना ते कपडे आवडतात तर अनेक नाक मुरडत दुकानाबाहेर पडतात. अशा हो-नाहीच्या वादात ही खरेदी होते. याशिवाय लग्नामध्ये पुरुषांना भेटवस्तू देण्याची पद्धत असते. हे ओळखूनच शाल, टोपी व छोटे टॉवेलही घाऊक दरात विकल्या जातात.

zomato swiggy now sell their food products directly to consumer
झोमॅटो, स्विगीकडून आता त्यांच्या खाद्य उत्पादनांची थेट विक्री; हॉटेल व्यावसायिकांचा विरोध, कारवाईची सरकारकडे मागणी 
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
survey licenses for qualified hawkers are stalled
पिंपरी : डिजिटल स्वाक्षरीअभावी दोन वर्षांपासून परवान्यांंचे वितरण रखडले
anti narcotics squad arrest rajasthan youth in kharadi area for selling opium
अफू विक्री करणारा गजाआड; राजस्थानातील तरुणाकडून दोन लाखांची अफू जप्त
viraj bahl Success Story
Success Story: “याला म्हणतात जिद्द…” कंपनी विकली, घर विकलं.. अन् मेहनतीच्या जोरावर उभा केला करोडोंचा व्यवसाय
cotton price farmers are still facing problems
कापूस उत्‍पादकांची परवड ‘सीसीआय’नेही घटवले दर…
Agriculture Commissioner, traders ,
शेतीमाल हमीभावाने खरेदी न करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करा, कृषी आयुक्तांचे आदेश
Nagpur, police constables suspended ,
नागपूर पोलिसांना झाले तरी काय? दोन वसुलीबाज हवालदार निलंबित

वर्षांनुवर्षे या बाजारात बस्त्याची पद्धत सुरू आहे. दुकानदारांनाही या पद्धतीची माहिती असल्याने विक्रेता ग्राहकाच्या आवडीनुसार न थकता साडय़ा दाखवीत असतो. एका ग्राहकासाठी सुमारे २० ते ३० साडय़ा दाखविण्यासाठी काढल्या जातात. आणि मोठे कुटुंब दुकानात शिरले तर किती साडय़ा दाखवाव्या लागतील याचे गणित नसते. त्यामुळे या दुकानात शिरल्यानंतर कायम साडय़ांची घडी करण्याचे काम सुरू असते. मंगलगिरी कॉटन, चंदेरी, सुपरनेट कोटा, भगलपुरी सिल्क, शिफॉन, बनारसी यांसारखे अनेक कपडय़ांचे प्रकार येथे उपलब्ध आहेत. या परिसरात बांधणीप्रेमींसाठी खास तीन ते चार दुकाने आहेत. येथील बांधणीच्या कुडत्याचे कापड घेण्यासाठी तरुणींची गर्दी असते. नवरात्रौत्सवात तर ही गर्दी वाढते व बांधणीची किंमतही. साध्या बांधणीवर आरशाचे डिझाईन किंवा सोनेरी-चंदेरी सजावटीची भरजरी बांधणी तरुणींना आकर्षित करते. सुरुवातीला केवळ पारंपरिक कपडय़ांसाठी ओळखला जाणारा हिंदमाता बाजार आता कात टाकत आहे. गेल्या काही वर्षांत येथे छोटय़ा दुकानांची जागा मोठमोठय़ा मॉलसदृश दुकानांनी घेतली आहे. या दुकानात मोठय़ा ब्रंॅडचे कपडे खरेदी करण्यासाठी ग्राहक वळत आहेत.  या कपडय़ांच्या किमती हिंदमातातील इतर दुकानांपेक्षा अनेक पटीने जास्त आहेत. हिंदमाताच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर या मार्गावर सुरू असलेल्या या बाजारात साधारण १ हजारांहून जास्त दुकाने आहेत. कपडय़ांबरोबरच येथे कृत्रिम दागिने व बॅगांचीही खरेदी मोठय़ा प्रमाणात होते. काही वर्षांपूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्त्याच्या टोकाला पोलीस चौकीच्या पुढे नवीन कपडय़ाचा बाजार सुरू झाला आहे. काहीशा मॉल पद्धतीप्रमाणे सुरू झालेल्या या बाजारात तळमजल्यावर सुमारे ४० ते ५० दुकाने थाटण्यात आली आहेत. येथेही किरकोळ व घाऊक असा दोन्ही बाजार भरतो. येथे प्रामुख्याने पुरुषांच्या कपडय़ांची दुकाने आहेत. या दुकानांत विविध ब्रॅण्डचे शर्ट व विजारींचा कपडा मिळतो. याशिवाय घरातील पडदे, चादरी, बेड कव्हर किंवा मॅचिंग दुपट्टा आदी खरेदी करण्यासाठी येथे महिलांची कायम गर्दी असते. सणासुदीच्या काळात तर ही गर्दी दुप्पट होते. गणेशोत्सवाच्या निमित्ताने सध्या बाजारात गौरीचे दागिने आणि साडय़ांचा खप वाढला आहे.

हिंदमाता या भागात अनेक बाजाराची छोटी छोटी ठिकाणे आहेत. त्यामध्येही दादर स्थानकाजवळील बाजार हा महिलांच्या आवडीचा. सुमारे साठ वर्षांपूर्वी गुजरातमधील कुच भागातील व्यावसायिकांनी हिंदमाता भागात कपडय़ांचा बाजार सुरू केल्याचे म्हटले जाते. हळूहळू या बाजाराचा विस्तार झाला आणि इमारतींच्या तळमजल्यावर ही दुकाने थाटू लागली. एकदा का तुम्ही या दुकानांमध्ये शिरला की एखादी तरी साडी विकत घेतल्याशिवाय दुकानदार तुम्हाला जाऊ  देत नाही. येथील अधिकतर दुकानदार हे गुजराती व मारवाडी समाजातील आहेत. मुंबईत सुरुवातीपासूनच गुजराती समाज कपडय़ांचा व्यवसाय करत आहे. आजही ही परंपरा कायम आहे हे विशेष. सुरुवातीपासूनच साडय़ांची आवक ही सुरतहून केली जात होती. याशिवाय दिल्ली, राजस्थान, ओरिसा येथूनही साडय़ांची आवक होते. येथे विकल्या जाणाऱ्या साडय़ांच्या किमती सुमारे १५० रुपयांपासून ४० ते ५० हजारांपर्यंत आहेत. त्याशिवाय लग्नसमारंभात सध्या घेरदार घागरा घालण्याची पद्धत रूढ होत आहे. या घागऱ्यांची किंमत ५० हजारांपासून २ ते ३ लाखापर्यंतही असतात. त्यामुळे सर्व वर्गातील ग्राहकांना परवडेल व आवडेल अशा स्वरूपाचा हिंदमाताचा बाजार दिवसेंदिवस विस्तारत आहे.

मीनल गांगुर्डे meenal.gangurde8@gmail.com

Story img Loader