मुंबई : हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील डॉ. अंकेत जाधव या तरुणाने पहिल्याच प्रयत्नात ‘यूपीएससी’ परीक्षेत देशात ३९५ वा क्रमांक प्राप्त करीत यशाला गवसणी घातली. आई – वडील दोघेही शेतकरी व जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षण घेऊन डॉ. अंकेत जाधव याने ‘यूपीएससी’ परीक्षेत ३९५ वा क्रमांक प्राप्त केला. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील शिवानी गावातील शेतकरी कुटुंबात डॉ. अंकेत जाधव याचा जन्म झाला. आई – वडील दोघेही शेतकरी, जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षण, महात्मा फुले विद्यालयात दहावीपर्यंतचे शिक्षण, नांदेडमधील यशवंत महाविद्यालयात अकरावी व बारावी पर्यंतचेस शिक्षण आणि बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसचे शिक्षण डॉ. अंकेत जाधव याने घेतले. असा शैक्षणिक प्रवास पूर्ण करून तो सध्या वाकोडीतील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे.

हेही वाचा : फूड डिलिव्हरीचा स्टार्टअप ते ‘यूपीएससी’ परीक्षेत यश, धुळ्याचा हिमांशू टेंभेकर देशात ७३८ वा

करोनाकाळात यूपीएससी’ परीक्षा द्यायचे हे त्याने मनाशी पक्के केले होते. त्यानंतर वेळेचे चोख नियोजन व सातत्यपूर्ण अभ्यास करीत त्याने हे यश प्राप्त केले. तसेच संयम, सकारात्मक विचार आणि स्वतःच्या अभ्यासपद्धतीच्या जोरावर डॉ. अंकित जाधव याने यशाला गवसणी घातली. ‘वेळेचे योग्य नियोजन आणि सातत्य राखत मी ‘यूपीएससी’ परीक्षेत यश प्राप्त केले. या प्रवासात सातत्यपूर्ण अभ्यास करणे महत्वाचे असते. तर ‘यूपीएससी’ परीक्षा देऊ इच्छीणाऱ्यांनी बॅकअप प्लॅन तयार ठेवणे गरजेचे असते. मी बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण करून सध्या वाकोडीतील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे. तसेच संयम व सकारात्मक विचार कायम ठेवणेही आवश्यक आहे’, असे डॉ. अंकेत जाधव याने सांगितले.

Story img Loader