मुंबई : म्हाडाचे वांद्रे पूर्व येथील मुख्यालय असलेल्या म्हाडा भवनात घराचा ताबा घेण्यासह विविध कामांसाठी तान्ह्या बाळाला सोबत घेऊन येणाऱ्या महिलांची अनेकदा अडचण होते. स्तनपान वा बाळाच्या आरामासाठी जागा नसल्याने त्यांची गैरसोय होते. आता मात्र त्यांची ही गैरसोय दूर होणार आहे. आता म्हाडा भवनात सुसज्ज असे हिरकणी कक्ष उभारण्यात येणार आहे. तीन – चार दिवसांत या हिरकणी कक्षाच्या कामाला सुरुवात होणार असून १५ दिवसांत हा कक्ष कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. हा कक्ष कार्यान्वित झाल्यास तान्ह्या बाळासह म्हाडा भवनात येणाऱ्या महिलांना एक चांगली सुविधा उपलब्ध होणार आहे.

भारतीय स्तनपान प्रसारक मंडळाने स्तनदा माता आणि बाळांचे आजार यावर मात करण्यासाठी हिरकणी कक्ष ही संकल्पना मांडली. त्यानुसार राज्य सरकारने प्रत्येक शासकीय कार्यालयात हिरकणी कक्ष उपलब्ध करण्यासंबंधी परिपत्रक प्रसिद्ध केले. हा कक्ष नेमका कसा असावा, या कक्षात कोणकोणत्या सुविधा असाव्यात यासंबंधीच्या मार्गदर्शक सूचनाही प्रसिद्ध करण्यात आल्या. राज्य सरकारच्या या निर्देशानुसार म्हाडाकडून म्हाडा भवनातील दुसऱ्या मजल्यावर हिरकणी कक्ष तयार करण्यात आला. मात्र या कक्षाबाबत कोणालाही माहिती नसल्याने आणि तेथे कोणत्याही सोयी-सुविधा नसल्याने त्याचा वापर होत नव्हता. तर दुसरीकडे मुंबई मंडळाच्या आणि कोकण मंडळाच्या पणन कक्षात घराचा ताबा घेण्यासह इतर कामांसाठी येणाऱ्या महिला, तसेच तान्ह्या बाळाला सोबत घेऊन येणाऱ्या महिलांची संख्या मोठी आहे. तान्ह्या बाळाला सोबत घेऊन येणाऱ्या महिलांना स्तनपानासाठी व्यवस्था नसल्याने गैरसोय होत आहे. तर बाळाला कुठे झोपवावे हाही प्रश्न असतो. या बाबी लक्षात घेऊन मुंबई मंडळाने आता हिरकणी कक्ष सुसज्ज करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मुंबई मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

old womans dead body found in Mutha river police investigation underway
पुणे : मुठा नदी पात्रात ज्येष्ठ महिलेचा मृतदेह, पोलिसांकडून तपास सुरू
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
slum MIDC
एमआयडीसीलाही झोपड्यांच्या जागा, ‘क्लस्टर’साठी साडेबारा टक्के योजनेचा प्रस्ताव
Zopu scheme, MHADA developer, MHADA,
‘झोपु’ योजनेत म्हाडा विकासक, पहिल्यांदाच जबाबदारी; चार प्रस्ताव प्राधिकरणाकडे
Controversial statement of MP Dhananjay Mahadik on Ladki Bahin Yojana
लाडकी बहीण योजनेवरून खासदार धनंजय महाडिक यांचे वादग्रस्त विधान; खासदार प्रणिती शिंदे, आमदार सतेज पाटील यांचे टीकास्त्र
maharashtra vidhan sabha election 2024 ,
बेलापूरच्या प्रचारात राम, कृष्ण, गजाननाचा गजर !
house lottery application, deadline, Navi Mumbai,
घरे सोडत अर्ज नोंदणीसाठी मुदतवाढीची मागणी, आवश्यक कागदपत्रे मिळवण्यासाठी दिलेली मुदत अपुरी असल्याचे अनेकांचे मत
pune video
वाढीव पुणेकर! एवढे उत्साही लोक फक्त पुण्यातच भेटतात, पठ्ठ्याने कारला केली लायटिंग, Video Viral

हेही वाचा – सोडतीला प्रतिसाद वाढतोय, इच्छुक अर्जदार लाखा पार; अनामत रक्कमेसह ७९ हजारांहून अधिक अर्ज

हेही वाचा – Mumbai Ganesh Visarjan 2024 : ढोल-ताशाच्या गजरात गणेश विसर्जन

म्हाडा भवनातील दुसऱ्या मजल्यावरील खोली क्रमांक ३३४ मध्ये सुसज्ज असा हिरकणी कक्ष उभारण्यात येणार आहे. यात खुर्ची, खाट, चटई, पिण्याचे पाणी यासह अन्य काही सुविधा उपलब्ध करण्यात येणार असल्याचेही अधिकाऱ्याने सांगितले. सुसज्ज अशा या हिरकणी कक्षाच्या उभारणीसाठी दोन लाख रुपये खर्च अपेक्षित असून या हिरकणी कक्षाच्या कामासाठी मुंबई मंडळाने नुकत्याच निविदा मागविल्या होत्या. शुक्रवारपर्यंत निविदा अंतिम करून तात्काळ कक्षाच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. येत्या १५ दिवसांत हिरकणी कक्ष कार्यान्वित करण्यात येणार असल्याचेही अधिकाऱ्याने सांगितले. हा कक्ष कार्यान्वित झाल्यास म्हाडा भवनात तान्ह्या बाळासह येणाऱ्या महिलांची मोठी सोय होणार आहे.