अलीकडेच आरे कॉलिनीतील हबाले पाड्याचा परिसर पुन्हा एकदा चर्चेत आला. मुंबई महानगरपालिकेतर्फे प्रस्तावित गोरेगाव- मुलुंड जोडरस्त्याच्या कामाला आता सुरुवात झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून या परिसरातील आदिवासी पाड्यातून जाणाऱ्या रस्त्यासाठी सर्वेक्षणाचे काम सुरू झाले. पूर्वसूचना न देता आलेल्या सर्वेक्षकांमुळे आदिवासींनी आंदोलनाला सुरूवात केली. मुंबईच्या प्राचिनतेबद्दल आपण बोलतो त्या त्या वेळेस मूळ मुंबईकर म्हणून आपण कोळी- आगरी यांचा उल्लेख करतो. पण आपल्याला इथल्या दऱ्या-खोऱ्यांमध्ये राहणाऱ्या आदिवासींचा विसर पडतो. गेली काही शतके तेही याच मुंबईचा भाग आहेत. ते प्रामुख्याने जंगलातच राहतात. शहरातील त्यांचा वावर तसा कमीच असतो. मात्र अलीकडे विकास कामांच्या निमित्ताने तर कधी त्यांचे पाडे हटविण्यावरून ते चर्चेत येतात तर कधी त्यांना जंगलातून हुसकावण्याच्या कृतीमुळे ते आंदोलनाचा पवित्रा घेतात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा