पुणे ते नगर मार्गावर पहिली एसटी बस १९४८ साली रवाना झाली. त्यानंतर एसटीचा विस्तार वाढला आणि नवनवीन बसगाड्या सेवेत येऊ लागल्या. प्रवाशांना या बसगाड्यांचा इतिहास सांगणाऱ्या प्रतिकृती एसटीच्या कुर्ला नेहरुनगर आगारातील प्रवेशद्वारांवरच ठेवण्यात आल्या आहेत. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून इतिहास सांगणाऱ्या या प्रतिकृती उद्घाटनाच्या प्रतिक्षेत आहेत. याशिवाय आगाराच्या प्रवेशद्वाराला लागूनच उभारलेल्या ‘सेल्फी विथ एसटी’चेही उद्घाटन बाकी आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

राज्यात १९४८ साली एसटीची सेवा सुरू झाल्यानंतर विविध बस प्रकार सेवेत आले. यामध्ये लाल रंगाची साधी बस, निमआराम बस, मिडी यशवंती बस, शिवनेरी, शिवशाही आणि अश्वमेध वातानुकूलित बस, दोन दारे असलेल्या शहर वाहतुक बसचा समावेश आहे. वातानुकूलित शिवनेरी २००२ पासून, तर २०१६ ला पहिली वातानुकूलित शिवशाही मुंबई ते रत्त्नागिरी मार्गावर चालवण्यात आली. त्यापूर्वो १९८२ मध्ये नवी दिल्ली येथे भरलेल्या एशियाड (निमआराम) स्पर्धेत परदेशी खेळाडूंना त्यांच्या निवासस्थानापासून स्टेडियम पर्यंत ने-आण करण्यासाठी महाराष्ट्राच्या एसटी महामंडळाने बांधलेल्या नव्या कोऱ्या बसेसचा वापर करण्यात आला. नंतर या बस दादर ते पुणे मार्गावर चालवण्यात आल्या. या बस गाड्यांना त्या काळात एशियाड नावानं ओळखलं जाऊ लागलं. बसचा इतिहास सांगणाऱ्या प्रतिकृती एसटीच्या कुर्ला नेहरु नगर आगारातील प्रवेशद्वारांवर बसविण्यात आल्या. एसटी महामंडळ आणि मुंबई महानगरपालिकेमार्फत हे काम करण्यात आले. याबरोबरच प्रवाशांसाठी ‘सेल्फी विथ एसटी‘ही करण्यात आले आहे. यांचे उद्घाटन माजी परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळ अध्यक्ष अनिल परब यांच्या हस्ते करण्यात येणार होते. परंतु ईडी चौकशी आणि त्यानंतर सत्तांतर घडामोडींमुळे उद्घाटन कार्यक्रम बाजूलाच राहिले. सध्या बसच्या प्रतिकृती आणि सेल्फी विथ एसटी उपक्रमाला झाकोळण्यात आले आहे.

प्रवाशांसाठी आकर्षण ठरणार –

एसटीचे मुंबईतील कुर्ला नेहरू नगर आगार हे सर्वात मोठे आगार आहे. कोकणसह राज्यातील विविध मार्गांवर एसटी बस येथून सोडण्यात येतात. दररोज ३०० पेक्षा अधिक बस फेऱ्या होतात.त्यामुळे या आगारात प्रवाशांची ये-जा कायम असते. त्यामुळे एसटीचा इतिहास सांगणाऱ्या प्रतिकृती आणि सेल्फी विथ एसटी प्रवाशांसाठी आकर्षण ठरणार आहेत.