मद्यपान करून भरधाव गाडी चालवून पदपथावर झोपलेल्या काही जणांना चिरडल्याप्रकरणी सदोष मनुष्यवधाच्या आरोपाखाली खटला चालवण्यात येऊ नये, अशी विनंती करणारी अभिनेता सलमान खानची याचिका सत्र न्यायालयाने सोमवारी फेटाळली. सलमान खानच्या अडचणीत यामुळे वाढ झालीये.
मुंबईतील मुख्यदंडाधिकारयांनी सलमानवर सदोष मनुष्यवधाचा आरोप ठेवत या खटल्याचा फेरतपास करण्याचा आदेश दिला होता. मुख्यदंडाधिकारयांच्या निर्णयाविरोधात सलमानने सत्र न्यायालमध्ये विनंती अर्ज दाखल केला होता. या विनंती अर्जामध्ये आपल्यावर सदोष मनुष्यवधाच्या आरोपाखाली खटला चालवण्यात येऊ नये, अशी विनंती सत्र न्यायालयाला केली होती. ती सोमवारी फेटाळण्यात आली.
“सलमानवर अतिशय गंभीर आरोप लावण्यात आला असून, मुख्यदंडाधिकारयांचा आदेश उपलब्ध पुराव्यांच्या पूर्ण विरोधी व कायद्याच्या दृष्टीने चुकीचा आहे.”, असा युक्तिवाद सलमानचे वकील अशोक मुंदरगी यांनी केला होता. न्यायालयाने तो फेटाळला.

Story img Loader