घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून रविवारी चैत्यभूमी स्मारक टपाल तिकिटाचे प्रकाशन राज्यपाल के. शंकरनारायण यांच्या हस्ते चैत्यभूमीवर करण्यात आले.
जागतिकीकरणाच्या प्रक्रियेच्या लाभांपासून दुर्बल घटक मोठय़ा प्रमाणात वंचित असून त्यांना आर्थिकदृष्टय़ा सक्षम करण्याची गरज असल्याचे शंकरनारायण यांनी यावेळी सांगितले.
इंदू मिलच्या जागेवर स्मारक करण्यासाठी केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक तेथे उभे राहील, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यावेळी सांगितले. राज्य सरकारतर्फे डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला सामाजिक संस्था आणि समाजकार्य करणाऱ्या व्यक्तींना डॉ. आंबेडकर समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. मुंबई व परिसरात रविवारी घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.