मराठी चित्रपट, मराठी मालिका आणि हिंदी मालिका तसेच ‘स्टॅण्डबाय’ हा हिंदी चित्रपट या क्षेत्रांमध्ये दिग्दर्शक म्हणून आपला ठसा उमटविणारे दिग्दर्शक संजय सूरकर यांचे अलीकडेच निधन झाले. चित्रपट-मालिका सृष्टीतर्फे आणि रसिकांच्या वतीने त्यांना आदरांजली वाहण्यासाठी सांस्कृतिक संचालनालयाच्या वतीने बुधवार, १७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता रवींद्र नाटय़ मंदिर, प्रभादेवी येथील मिनी थिएटरमध्ये ‘चित्रचौकटीचा राजा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
‘आपली माणसं’, ‘चौकट राजा’, ‘सातच्या आत घरात’, ‘तू तिथे मी’, ‘सुखान्त’, ‘घराबाहेर’ आदी चित्रपटांद्वारे वेगळे विषय हाताळून सूरकर यांनी आपला ठसा उमटविला.

Story img Loader