बलात्काराच्या आरोपामुळे अडचणीत आलेले मुंबईतील पोलीस उपमहानिरीक्षक सुनील पारसकर यांना निलंबित करण्याची शिफारस राज्याच्या गृह मंत्रालयाने केली आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यावर अंतिम निर्णय घेणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पारसकर यांना निलंबित करण्यात येण्याची शक्यता दाट आहे.
पंधरवड्यापूर्वी पारसकरांना मुंबईतील न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला होता. पारसकर यांना ताब्यात घेऊन चौकशीची गरज नसल्याचे न्यायालयाने म्हटले होते.
मुंबईतील एका मॉडेलने पारसकर यांच्याविरोधात विनयभंग आणि बलात्काराचा आरोप करत नोटीस धाडली होती. गेल्या काही दिवसांपासून हे प्रकरण अधिक गुंतागुंतीचे होत चालले आहे. बलात्कारप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करताना संबंधित मॉडेलने प्राथमिक निष्कर्ष अहवालात जी माहिती दिली होती ती बरीचशी आठवणींच्या आधारे दिली होती. त्यानंतर पुरवणी जबाबामध्ये तिने काही पुरावे सादर केले आहेत. त्यामध्ये पारसकर यांना दिलेले ६७ हजार ५७५ रुपयांचे लॉनजिन्स ब्रँडचे घडय़ाळ, २१ हजार ६०० रुपये किमतीचे पाकीट, ३३ हजार रुपयांचे माऊंट ब्लँक पेन आणि पाच हजार रुपयांचे परफ्युम या भेटवस्तूंच्या बिलांचा समावेश आहे. गोरेगाव पोलीस ठाण्याने संबंधित मॉडेलच्या बाजूने गुन्हा दाखल केल्यानंतर या भेटवस्तू देण्यात आल्या, असे या जबाबात नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर पारसकर यांनी आयफोन भेट दिला होता. हा फोन मॉडेलने सादर केला असून त्यात ‘व्हॉटस्अॅप’वरील संदेश आणि फोनमधील एसएमएस तपासण्याची विनंती केली आहे.
वाशी येथील ज्या फ्लॅटमध्ये विनयभंग झाला त्या फ्लॅटमध्ये आपण आणि पारसकर एकत्र गेल्याचा पुरावा म्हणून सोसायटीचे रजिस्टर तपासण्याची विनंती करण्यात आली आहे. या रजिस्टरमध्ये पारसकर आणि मॉडेलचे गाडी क्रमांक नोंदल्याचे आढळून आले आहे. मढमधील ज्या बंगल्यात बलात्कार झाल्याचा दावा केला आहे त्या ठिकाणी वास्तविक एक बिल्डर येणार असून त्याच्याकडून स्वस्तात फ्लॅट मिळवून देण्याचे आमीष पारसकर यांनी दिले होते, असेही या पुरवणी जबाबात म्हटले आहे. परंतु प्रत्यक्षात मढमधील बंगल्यात पारसकर यांच्यासोबत अन्य कोणीही नव्हते. तेव्हाच त्यांनी बलात्कार केला, असा या मॉडेलचा आरोप आहे.
मॉडेलवरील बलात्कारातील आरोपी सुनील पारसकर यांच्या निलंबनाची शिफारस
बलात्काराच्या आरोपामुळे अडचणीत आलेले मुंबईतील पोलीस उपमहानिरीक्षक सुनील पारसकर यांना निलंबित करण्याची शिफारस राज्याच्या गृह मंत्रालयाने केली आहे.
First published on: 26-08-2014 at 01:50 IST
TOPICSसुनील पारसकर
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Home dept recommended suspension of sunil paraskar