मुंबईत सीसीटीव्ही बसविण्याचे काम मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून तडीस न गेल्याने आता गृहमंत्री आर.आर. पाटील आणि राज्यमंत्री सतेज पाटील यांच्यावर ती जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे आता नव्याने निविदाप्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.
मुंबईवर दहशतवादी हल्ला झाल्यावर सीसीटीव्ही बसविण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. त्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती नेमली गेली. परदेशांमधील सीसीटीव्ही यंत्रणेची माहिती घेण्यासाठी काही अधिकारी लंडनलाही जाऊन आले होते. निविदांमधील मोठा फरक, तांत्रिक बाबींमधील अडचणी यामुळे गेले चार वर्षे निविदा प्रक्रिया मार्गी लागली नाही.
मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत गृहमंत्र्यांना सर्वाधिकार देण्यात आले असून त्यांनी पुढाकार घेऊन लवकरात लवकर सीसीटीव्ही बसविले जातील, यासाठी पावले टाकण्याची सूचना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री पवार यांनी केली.

Story img Loader