मुंबई : मे महिन्यात मुंबईतील १२ हजार घरांची विक्री झाली असून राज्य सरकारला या घरांच्या विक्रीतून मुद्रांक शुल्कापोटी १ हजार ०३४ कोटी रुपये महसूल मिळाला. यंदा मुंबईतील घरविक्री स्थिर असून ११ हजार ते १४ हजारच्या दरम्यान राहिली आहे. जानेवारीत १० हजार ९९७, तर फेब्रुवारीत १२ हजार ५५ घरांची विक्री झाली होती. मार्चमध्ये मात्र त्यात वाढ झाली असून या महिन्यात तब्बल १४ हजार घरांची विक्री झाली. तर एप्रिलमध्ये ११ हजार ६४८ घरांची विक्री झाली. आता मेमध्ये घरविक्रीत किंचितशी वाढ झाली आहे.
मेमध्ये घरविक्रीने १२ हजारांचा टप्पा गाठला आहे. तर या घरविक्रीतून मुद्रांक शुल्कापोटी १०३४ कोटी रुपये महसूल मिळाला आहे. मे महिन्यातील ही घरविक्री समाधानकारक मानली जात आहे. मागील वर्षी मे महिन्यात नऊ हजार ८२३ घरांची विक्री झाली होती.
हेही वाचा…मुंबई : अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी कामावर रूजू, लोकल सेवा विलंबाने
२०२२ मध्ये नऊ हजार ८३९ घरांची विक्री झाली असून २०२१ मध्ये पाच हजार ३६० घरे विकली गेली होती. करोनाकाळात मे २०२० मध्ये केवळ २०७ घरांची विक्री झाली होती. दरम्यान मे २०२४ मधील घरविक्री ही आतापर्यंतची मे महिन्यातील सार्वधिक घरविक्री आहे. त्यामुळे ही घरविक्री समाधानकारक मानली जात आहे.