मुंबई : मुंबईतील जागेला सोन्याहुन अधिक भाव आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. वरळीतील दोन सदनिकांची विक्री तब्बल ९५ हजार रुपये प्रति चौरस फूट दराने झाली आहे. एकूण १६०७२ चौ फुटच्या या दोन घरांची किंमत १५१ कोटी झाली. वरळीत अल्ट्रा-लक्झरी प्रकल्प ३६० (थ्री सिक्स्टी) नावाची इमारत असून यात आलिशान अशी घरे आहेत. अभिनेता शाहिद कपूरसह अन्य कलाकारांचीही घरे आहेत. याच इमारतीतील दोन घरे नुकतीच १५१ कोटी रुपयांत विकली गेली. त्याची दस्तनोंदणी ८ सप्टेंबरला झाली असून प्रति चौरस फूट ९५ हजार रुपये अशा विक्रमी दरात ही दोन्ही घरे विकली गेली आहेत. यातील एक घर ५८ व्या आणि दुसरे घर ५९ व्या मजल्यावर आहे. ८०३६ चौ फुट क्षेत्रफळाचे एक घर आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा : Maharashtra News Live : दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर, जाणून घ्या प्रत्येक क्षणाचे अपडेट

या घरांसाठी खरेदीदाराने ९ कोटी ६ लाख रुपये इतके मुद्रांक शुल्क भरले आहे. आयजीई इंडिया प्रा. लि. नावाच्या कंपनीने ही घरे खरेदी केली आहेत. तर ओऍसिस रियल्टीकडून घरांची विक्री करण्यात आली आहे. मुंबईत आलिशान घरांना मागणी आहे. याच इमारतीतील घरे यापूर्वी ६५ ते ७० हजार रुपये प्रति चौरस दरात विक्री झाली आहे. आता या इमारतीला निवासी दाखला मिळाला असून त्यात सहा वाहने उभी करण्यासाठी जागा देण्यात आली आहे. त्यामुळे जागेचा भाव आणखी वाढल्याचे सांगितले जात आहे.