होमिओपॅथी आणि आयुर्वेदिक डॉक्टरांना अॅलोपॅथीचा वापर करून रुग्णांवर उपचार करण्याची परवानगी देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला अंतरिम स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाने बुधवारी नकार दिला. या आदेशामुळे होमिओपॅथी-आयुर्वेदिक डॉक्टरांना तूर्तास दिलासा मिळाला आहे.
सरकारच्या निर्णयाविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्या. अभय ओक व न्या. अजय गडकरी यांच्या खंडपीठासमोर याचिकेवर बुधवारी सुनावणी झाली. अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी फेटाळून लावण्यात आली. याबाबतचा सविस्तर लेखी आदेश महिन्याभरात दिला जाईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. होमिओपॅथी व आयुर्वेदिक डॉक्टरांना अॅलोपॅथी उपचारास परवानगी देण्याबाबत ‘महाराष्ट्र होमिओपॅथी प्रॅक्टिशनर्स अॅक्ट, महाराष्ट्र मेडिकल प्रक्टिशनर्स अॅक्ट व महाराष्ट्र मेडिकल काऊन्सिल अॅक्ट’मध्ये दुरुस्ती केली होती.
संग्रहित लेख, दिनांक 25th Dec 2014 रोजी प्रकाशित
होमिओपॅथी डॉक्टरांना दिलासा
होमिओपॅथी आणि आयुर्वेदिक डॉक्टरांना अॅलोपॅथीचा वापर करून रुग्णांवर उपचार करण्याची परवानगी देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला अंतरिम स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाने बुधवारी नकार दिला.
First published on: 25-12-2014 at 04:36 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Homeopathy doctors gets relaxation