नमिता धुरी
भरपूर मेहनत आणि अपुरे मानधन अशा विरोधाभासामुळे सध्या तरुण चित्रकारांमध्ये मुखपृष्ठ कलेविषयी निरुत्साह आहे. अलीकडच्या काळात कमी झालेला पुस्तकांचा खप आणि त्यामुळे प्रकाशकांच्या उत्पन्नावर झालेला परिणाम या कारणांमुळे प्रकाशकांना मुखपृष्ठकारांचे मानधन वाढवणे शक्य होत नाही. तसेच वाढत्या तंत्रज्ञानानेही या क्षेत्रातल्या संधी काही प्रमाणात हिरावून घेतल्या आहेत. त्यामुळे मुखपृष्ठकलेकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहणे तरुण चित्रकारांसाठी गैरसोयीचे ठरत आहे. शिवाय तरुण पिढीमध्ये असलेला वाचनसंस्कृतीचा अभावही त्यांना या कलेपासून दूर नेत आहे.
एक तरुण चित्रकार त्याने तयार के लेले मुखपृष्ठ घेऊन मुखपृष्ठकार सतीश भावसार यांच्याकडे गेला. भावसार यांनी त्याचे कौतुक करत हे काम पुढे सुरू ठेवण्याविषयी सुचवले. त्यावर त्याने सांगितले की, ‘मी बनवलेले हे पहिले आणि शेवटचे मुखपृष्ठ आहे’. त्याने व्यक्त के लेले मत म्हणजे सध्याच्या तरुण चित्रकारांची प्रातिनिधिक भावना आहे.
‘आम्हालासुद्धा या क्षेत्रात येताना सुरुवातीला प्रचंड अडचणी जाणवल्या होत्या. मात्र हळूहळू कामे मिळत गेली. पूर्वी पुस्तकाच्या ११०० प्रती छापल्या जात. आता फक्त ५०० प्रती छापल्या जातात. मुखपृष्ठकाराचे मानधन प्रकाशकांनी वाढवले तर पुस्तकाची किंमतही वाढेल, असे मुखपृष्ठकार सतीश भावसार सांगतात.
‘मुखपृष्ठ ही एक सर्जनशील गोष्ट आहे. ते तयार करायचे म्हणजे भरपूर वाचन करावे लागते. आजकाल वाचन कमी झाले आहे’, असे मुखपृष्ठकार रविमुकु ल सांगतात. ‘काही इंग्रजी पुस्तकांच्या मुखपृष्ठावर चित्र नसते. मोठय़ा अक्षरात फक्त नाव छापलेले असते. लहान मुलांसाठी पुस्तके खरेदी करताना काही ठरावीक विषयांवरील पुस्तके च पालक खरेदी करतात. त्यामुळे मुखपृष्ठकारांच्या संधी कमी झाल्या आहेत. आम्ही पैशांचा विचार न करता चित्रकार बनलो. आजची पिढी पैशांचा विचार करते. त्यामुळे त्यांचा कल अॅनिमेशनकडे आहे. कोणतीही कला कधीही संपत नसते. ती फक्त वेगळ्या स्वरूपात येत असते’, असे कार्टूनिस्ट क म्बाइनचे संजय मिस्त्री यांचे म्हणणे आहे. ‘काही चांगले चित्रकार असतील तर त्यांना आम्ही स्वत:हून काम देतो. त्यांच्या बौद्धिक संपदेचा आदरच करतो. पण पुस्तकांचा एकू ण खप कमी असल्यामुळे मुखपृष्ठकारांना मानधन कमी मिळते. शिवाय तरुण चित्रकारांना त्यांचे कौशल्य दाखवण्यासाठी विविध माध्यमे उपलब्ध झाली आहेत. कादंबरीचा विषय मांडणे आव्हानात्मक असते. क्वचित काही प्रकाशक हाताने काढलेल्या चित्रांचा आग्रह धरतात. बरेचजण तंत्रज्ञानाच्या
सहाय्याने मुखपृष्ठे तयार करतात. पण त्यात जिवंतपणा नसतो. त्यामुळे तरुण चित्रकारांनी मुखपृष्ठकला ही किमान कला म्हणून तरी जोपासावी,’ असे राजहंस प्रकाशनचे विनायक पणशीकर यांना वाटते.
पूर्वीच्या चित्रकारांना साहित्याची आवड होती. ते स्वत:हून प्रकाशकांना भेटायचे. नव्याने येऊ घातलेल्या पुस्तकांची माहिती घ्यायचे. ते भरपूर वाचन करत. पण आजकाल असे तरुण चित्रकार प्रकाशकांना भेटायला येतच नाहीत. मानधनाचा प्रश्न शेवटी येतो. त्याआधी चित्रकारांनी स्वयंस्फू र्तीने मुखपृष्ठक लेकडे वळले पाहिजे. कोणी नवे प्रयोग करायला तयार असेल तर आम्ही नक्की संधी देऊ.
-अशोक कोठावळे, मॅजेस्टिक प्रकाशन.