मुंबई : राष्ट्रीय रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिलकडून (नरेडेको) होमेथॉन नावाने एका मालमत्ता प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. वांद्रे-कुर्ला संकुल येथील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये २४ ते २६ नोव्हेंबर दरम्यान हे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. या प्रदर्शनाद्वारे ग्राहकांना मुंबई महानगर प्रदेशासह पुणे, नाशिक, नागपूर आदी ठिकाणच्या घरखरेदीचे पर्याय एका छताखाली उपलब्ध करू दिले जाणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

होमेथॉन प्रदर्शनात राज्यभरातील १५० हून अधिक विकासक आपल्या ५०० गृहप्रकल्पांसह सहभागी होणार आहेत. २० लाखांपासून १५ कोटी रुपयांपर्यंतच्या घराचे पर्याय या प्रदर्शनात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तर ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विकासकांकडून विविध सवलती देण्यात येणार आहेत.

हेही वाचा – मुंबईतील महागडी घरे नेतेमंडळींच्या आवाक्याबाहेरच; नवी मुंबईमध्ये आलिशान घरांचा घाट कशासाठी?

हेही वाचा – मराठा समाजाने संयम बाळगावा; मुख्यमंत्र्यांचे कळकळीचे आवाहन

नोंदणी शुल्क, मुद्रांक शुल्क, जीएसटी कर अशा अनेक करात सवलत देण्यात येणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे या प्रदर्शनात स्टेट बँक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय, एचडीएफसी अशा अनेक बँका सहभागी होणार आहेत. त्यामुळे ग्राहकांना तिथल्या तिथे गृहकर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे.