मुंबई: आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राज्याच्या वतीने विठ्ठलाची पूजा होते, तोच सन्मान आज मानपत्राच्या रूपाने मला मिळाल्याची भावना सरन्यायाधीश उदय लळित यांनी शनिवारी व्यक्त केली. गेली सदतीस वर्षे नवी दिल्लीत सर्वोच्च न्यायालयात वकील आणि न्यायमूर्ती म्हणून कार्यरत असताना जन्मभूमीच्या मातीच्या मायेची ऊब कायमच माझ्याबरोबर राहिल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

उदय उमेश लळित यांची भारताचे ४९वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल महाराष्ट्र सरकारच्या वतीने  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. राजभवन येथे आयोजित या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दिपांकर दत्ता, विधानसभा अध्यक्ष अ‍ॅड. राहुल नार्वेकर, सरन्यायाधीश यांच्या पत्नी अमिता लळित, मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, सर्वोच्च व उच्च न्यायालयाचे अनेक आजी-माजी न्यायमूर्ती उपस्थित होते.

या सत्काराच्या वेळी मनोगत व्यक्त करताना सरन्यायाधीश उदय लळित म्हणाले, माझी कर्मभूमी सर्वोच्च न्यायालय असली तरी तेथे प्रकरणे किंवा याचिका हाताळल्या, त्यात महाराष्ट्रातील याचिकांचे प्रमाण मोठे होते. मी सोलापूरचा आणि शालेय शिक्षण तेथे झाले. उच्चशिक्षण मुंबई व नागपूरलाही झाले. महाराष्ट्राचा सुपुत्र असल्याने घरात मराठमोळे वातावरण आहे.

जन्म, शिक्षण व व्यवसायानिमित्ताने कोकण, सोलापूर, नागपूर, मुंबई येथे अधिक संबंध आला असला तरी प्रत्येक जिल्ह्याची माहिती असावी, यासाठी महाविद्यालयात असताना मोटारसायकलवरून राज्यभरात मित्रांबरोबर फिरलो होतो. आळंदी ते पंढरपूर वारीमध्ये अनेकदा सहभागी झालो होतो. महाराष्ट्राच्या मातीशी जवळचा संबंध असल्याने मायेची ऊब कायम आपल्या सोबत आहे. महाराष्ट्राच्या मातीचा सुगंध कायम मनात राहील, असे लळित यांनी सांगितले.

 निवृत्तीनंतरही न्यायविषयक प्रक्रियेत आवश्यकता असेल, तेथे नक्की सहभाग घेऊ, असे लळित यांनी नमूद केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरन्यायाधीश लळित यांच्या कार्याचा गौरव करून न्यायालयीन कामकाज अधिक गतीने आणि पारदर्शकपणे व्हावे असा त्यांचा प्रयत्न असल्याचे सांगितले.  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरन्यायाधीश लळित यांचा राज्याला अभिमान असून त्यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार म्हणजे महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीच्या हस्ते सत्कार असल्याचे सांगितले.