गँग्ज ऑफ वासेपूर, तलाश, कहानी या चित्रपटांतून आपल्या कसदार अभिनयाची छाप सोडणारा अभिनेता नवाझुद्दिन सिद्दिकी याला आता आशियाई चित्रपट पारितोषिकानेही सन्मानित करण्यात आले आहे. ‘तलाश’ चित्रपटातील लंगडा तैमूर या भूमिकेसाठी नवाझुद्दिनला हे पारितोषिक मिळाले आहे. चीनचा ‘मिस्ट्री’ हा चित्रपट सवरेत्कृष्ट ठरला असून प्रीतम चक्रवर्ती यांना ‘बर्फी’ चित्रपटासाठी सवरेत्कृष्ट संगीतकार म्हणून सन्मानित करण्यात आले.
चीनमधील बडय़ा धेंडांच्या मिजासखोरीवर बोट ठेवणाऱ्या ‘मिस्ट्री’ या चित्रपटाला मिळालेल्या सवरेत्कृष्ट चित्रपटाच्या पारितोषिकामुळे सर्वाच्याच भुवया उंचावल्या आहेत. लाऊ यी या दिग्दर्शकाने दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाला चीनच्या सेन्सॉर बोर्डाने मंजुरी देताना बरीच खळखळ केली होती. तसेच चित्रपटातील काही दृष्यांना कात्री लावण्याची सूचनाही केली होती. या पाश्र्वभूमीवर या चित्रपटाला मिळालेला आशियाई चित्रपट पुरस्कार विशेष ठरला आहे. लाऊ यांच्या ‘समर पॅलेस’ या चित्रपटाला तर सरकारची मंजुरीही मिळाली नव्हती तरी २००६ मध्ये तो कान्स चित्रपट महोत्सवात समीक्षकांचे आकर्षणबिंदू ठरला होता.
नवाझुद्दिनचा सन्मान
गँग्ज ऑफ वासेपूर, तलाश, कहानी या चित्रपटांतून आपल्या कसदार अभिनयाची छाप सोडणारा अभिनेता नवाझुद्दिन सिद्दिकी याला आता आशियाई चित्रपट पारितोषिकानेही सन्मानित करण्यात आले आहे. ‘तलाश’ चित्रपटातील लंगडा तैमूर या भूमिकेसाठी नवाझुद्दिनला हे पारितोषिक मिळाले आहे.
First published on: 20-03-2013 at 05:41 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Honour of nawazuddin for role play in talash