राष्ट्रवादी काँग्रेसची आज महत्वपूर्ण बैठक पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यानंतर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांना बैठकीतील निर्णयाबाबत माध्यमांना माहिती दिली. यावेळी राज्याचे अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांच्या मंत्रिपदाबाबत आणि घेण्यात आलेल्या अन्य महत्वपूर्ण निर्णयाबाबत माहिती दिली.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, “ बैठकीत पक्ष संघटनेच्याबाबतीत आणि राज्यातील वेगळ्या गोष्टींच्याबाबतीत वेगळ्या मुद्यांची चर्चा झाली. वेगळे विषय जे सध्या सुरू आहेत, त्याबाबत साधकबाधक चर्चा झाली.” तर, नवाब मलिक यांच्याबद्दल काही चर्चा झाली का? कारण मुंबई अध्यक्षपद त्यांच्याकडे आहे आणि मुंबई महापालिका निवडणूक आहे, यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले की “ नवाब मलिक हे मुंबईचे अध्यक्ष आहेत आणि आज ते उपलब्ध होऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्याबरोबर कार्याध्यक्ष म्हणून नरेंद्र राणे आणि राखी जाधव या दोघांची नेमणूक आम्ही करणार आहोत. नवाब मलिक उपलब्ध नसल्याने पक्ष संघटनेची येणाऱ्या निवडणुका आणि अन्य सर्व गोष्टींची हाताळणी, आमचे हे दोन कार्याध्यक्ष नवाब मलिक यांच्यासमवेत करतील. ”

uddhav thackeray emotional appeal impact to voters
उद्धव यांचे भावनिक आवाहन ठाकरे सेनेला कितपत तारणार? मराठवाड्याकडे विशेष लक्ष?
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
nirmala sitharaman to meet states finance ministers for budget preparation
निर्मला सीतारामन अर्थसंकल्पाच्या तयारीला, राज्यांच्या अर्थमंत्र्यांची भेट घेणार! जीएसटी परिषदेच्या बैठकीपूर्वी मसलतही विषयपत्रिकेवर
amol kolhe bag checked after uddhav thackeray
उद्धव ठाकरेंनंतर महाविकास आघाडीच्या आणखी एका नेत्याच्या बॅगची तपासणी, नेमकं काय घडलं?
Amit Shah made special mention of Devendra Fadnavis in speech in shirala
अमित शहांनी फोन काढला आणि थेट फडणवीसांना लावला… म्हणाले, “पुन्हा…”
Uddhav Thackeray On Jay Shah :
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचं जय शाह यांना खुलं आव्हान; म्हणाले, “गावातील कोणत्याही तरुणाबरोबर क्रिकेट खेळून दाखवावं, मग…”
Uddhav Thackeray Narendra Modi (4)
“…तर मी या निवडणुकीतून माघार घ्यायला तयार आहे”; उद्धव ठाकरेंचे पंतप्रधान मोदींना आव्हान!
Devendra Fadnavis Answer to Uddhav Thackeray
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना खुलं आव्हान “छत्रपती शिवरायांचं पहिलं मंदिर मुंब्र्यात उभारुन दाखवा, आम्ही..”

तसेच, “नवाब मलिक यांचा जामीन पुन्हा फेटाळण्यात आला आहे आणि त्यामुळे त्यांच्याकडच्या जबाबदाऱ्या या इतरांना देण्याचं काम हे या दोन-चार दिवसांत पूर्ण होईल. नवाब मलिक जोपर्यंत पुन्हा उपलब्ध होत नाहीत, तोपर्यंत ज्या जिल्ह्याचे त्यांच्याकडे पालकमंत्रीपद आहे ते जिल्हे आणि त्यांच्याकडच्या खात्यांची जबाबदारी ते नसल्यामुळे काम थांबू नये, यासाठी तात्पुरती व्यवस्था करायचं आम्ही ठरवलं आहे.” अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली.

मुख्यमंत्री त्यावर अंतिम निर्णय घेतील –

याचबरोबर, “नवाब मलिक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष आहेत, आम्ही दोन कार्याध्यक्ष नेमतो आहोत. नरेंद्र राणे आणि महानगरपालिकेतील गटनेत्या राखी जाधव यांना कार्याध्यक्ष म्हणून काम करण्याची जबाबदारी देतोय. तसेच, नवाब मलिकांकडे दोन जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद होतं. तिथे आता परभणीत धनंजय मुंडे हे पालकमंत्री असतील आणि गोंदियात प्राजक्त तनपुरे हे पालकमंत्री असतील, हा निर्णय आम्ही घेतला आहे. उद्याच मी मुख्यमंत्र्यांनी मी पत्र पाठवून आमच्या पक्षाकडून हा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना कळवला जाणार आहे, मुख्यमंत्री त्यावर अंतिम निर्णय घेतील. नवाब मलिकांच्या अनुपस्थितीमुळे त्यांच्या विभागाचं काम पूर्णपणे ठप्प झालं आहे. यामुळेच ही जबाबदारी दुसऱ्या मंत्र्यांना देण्याची आवश्यकता आहे.” असं देखील जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले.

नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना चुकीच्या पद्धतीने डांबून ठेवलय –

“नवाब मलिक आणि अनिल देशमुख या दोघांना चुकीच्या पद्धतीने डांबून ठेवलेलं आहे. अनिल देशमुखांनी अटक झाल्यावर स्वत:हून राजीनामा दिला. नवाब मलिक यांची जी अटक झालेली आहे ती चुकीच्या पद्धतीने झाली आहे, अशी आमची धारणा आहे. त्या पद्धतीने न्यायालयात लढाई सुरू आहे.तोपर्यंत त्याच्या विभागाचा भार हा दुसऱ्यांना सोपवला जात आहे, नवाब मलिक हे मंत्रिपदावर कायम राहतील.”

देवेंद्र फडणवीसांना लगावला टोला –

तर पेनड्राईव्ह प्रकरणाबाबत बोलताना जयंत पाटील यांनी, पेनड्राईव्हची सत्यता तपासली गेली पाहिजे. फॉरेन्सिक लॅबकडे ते पाठवले पाहिजेत आणि मग त्यावर बोललं पाहिजे. असं सांगितलं. याचबरोबर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी २०२४ मध्ये महाराष्ट्रात भाजपाचं सरकार असेल अस म्हटलंय, यावर प्रतिक्रिया देताना जयंत पाटील यांनी ”म्हणजे २०२४ पर्यंत ते येत नाहीत, आमचंच सरकार राहणार हे त्यांनी मान्य केलं. याबद्दल मी महाविकासघाडी तर्फे त्यांचे आभार मानतो.” अलं म्हणत टोला लगावला.