मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांना पक्षात किती किंमत आहे हे राहुल गांधी यांनी दाखवून दिले आहे, असा टोला राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मारला असतानाच राष्ट्रवादीची काय अवस्था झाली हे प्रवक्त्याच्या कुंटुबियांनीच दाखवून दिले आहे. कारण त्यांच्या भावानेच राष्ट्रवादी सोडल्याचा प्रतिहल्ला काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी चढविला. राष्ट्रवादीचे प्रवक्ते मलिक यांच्या भावाने मनसेमध्ये प्रवेश करण्याचे जाहीर केले आहे. त्याचा उल्लेख करून या प्रवक्त्यांच्या कुटुंबियाला राष्ट्रवादीचे भवितव्य काय आहे याचा अंदाज आला आहे, अशा शब्दांत सावंत यांनी राष्ट्रवादीला लक्ष्य केले. काँग्रेस पक्षात प्रत्येकाची कार्यकक्षा निश्चित असते. मलिक हे उठसूठ सर्वांना सल्ले देतात. आता आर्थिक अडचणीत सापडलेल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ओबामा यांनाच सल्ला देण्याचे बाकी आहे, अशीही टीका त्यांनी केली. आघाडीत काँग्रेस २९ तर राष्ट्रवादी १९ असेच जागावाटप व्हावे या मागणीचाही त्यांनी पुनरुच्चार केला.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांमध्ये जुंपली !
मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांना पक्षात किती किंमत आहे हे राहुल गांधी यांनी दाखवून दिले आहे, असा टोला राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मारला
आणखी वाचा
First published on: 12-10-2013 at 12:06 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hot argument between congress and ncp spokesperson