मुंबई : मुंबईतील घरांच्या किमती गगनाला भिडत असतानाच आता मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) घरांच्या किमतीत मोठी वाढ होत आहे. मागील पाच वर्षांत विरारमधील घरांच्या किमतीत ५८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. २०१९ मध्ये प्रती चौरस फूट ४४०० रुपये असलेले घरांचे दर २०२४ मध्ये थेट प्रती चौरस फूट ६८०५ रुपयांवर पोहोचले आहेत. तर दुसरीकडे पनवेलमधील घरांच्या किमती २०१९ मध्ये प्रती चौरस फूट ५५२० रुपये होत्या, त्या २०२४ मध्ये थेट प्रती चौरस फूट ८७०० रुपयांवर पोहोचल्या आहेत. मुंबई शहराचा विचार करता वरळीतील किमतीत ३७ टक्क्यांनी, तर लोअर परळमधील घरांच्या किमतीत ४९ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

करोनाचे संकट आल्यानंतर बांधकाम व्यवसायाला मोठा फटका बसला. करोनाचे सावट दूर झाल्यानंतर बांधकाम व्यवसायात तेजी येण्यास सुरुवात झाली. महत्त्वाचे म्हणजे करोनाकाळात भाड्याच्या घरापेक्षा हक्काच्या घरात राहण्याकडे मोठ्या संख्येने नागरिकांचा कल वाढला. त्यामुळेच घरांच्या खरेदी-विक्रीत वाढ होण्यास सुरुवात झाली. दुसरीकडे मागील काही वर्षात एमएमआरमध्ये पायाभूत सुविधांचा झपाट्याने विकास होत आहे. मेट्रो, सागरी सेतू, उड्डाणपूल, सागरी मार्ग, द्रुतगती मार्ग यांसारखे अनेक प्रकल्प विविध सरकारी यंत्रणांच्या माध्यमातून राबविले जात आहेत. परिणामी एमएमआरमधील घरांच्या मागणीत मागील काही वर्षांत मोठी वाढ झाली आहे. या वाढीच्या अनुषंगाने घरांच्या किमतीतही वाढ होत आहे. त्यामुळेच मागील वर्षात मुंबई शहराच्या तुलनेत एमएमआरमधील घरे अधिक महाग होत असल्याचे निदर्शनास आले आहे. ‘ॲनराॅक’च्या अहवालानुसार मागील पाच वर्षांत एमएमआरमधील विरार आणि पनवेलमधील घरांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. विरारमधील घरांच्या किमती २०१९ मध्ये प्रती चौरस फूट ४४०० रुपये होत्या. त्यात २०२४ मध्ये ५८ टक्क्यांनी वाढ झाली आणि त्या प्रती चौरस फूट ६८०५ रुपयांवर पोहोचल्या. तर पनवेलमधील घरांच्या किमती २०१९ मध्ये प्रती चौरस फूट ५५२० रुपये होत्या. त्या २०२४ मध्ये थेट प्रती चौरस फूट ८७०० रुपयांवर पोहोचल्या. त्यात ५८ टक्के वाढ झाली आहे.

Mumbai transport department Japan policy
वाहन खरेदीवर नियंत्रण आणण्याचा परिवहन विभागाचा विचार, जपानच्या धर्तीवर नवे धोरण राबविणार
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
CIDCO announced rates of 26 thousand houses in Navi Mumbai
परवडणारे घर ७४ लाखांचे! सिडकोच्या अल्प उत्पन्न घरांचे दर पाहून अर्जदार अवाक्
Budget Out of 36 thousand crores, only 18 thousand crores were spent Mumbai news
अर्थसंकल्पाचा फुगवटा यंदाही कायम? ३६ हजार कोटींपैकी केवळ १८ हजार कोटीच खर्च
Shelu and Wangani housing project opposed by mill worker
वांगणीतील घरे नापसंत, प्रकल्प रद्द करण्याची गिरणी कामगारांच्या संघटनांची मागणी, तर शेलूतील घरांच्या किमती सहा लाख करा, मुख्यमंत्र्यांना पत्र
Mumbai, Increase in PM 2.5 levels,
मुंबईत पीएम २.५ च्या पातळीत वाढ
residential housing market Mumbai , Knight Frank India,
मुंबई देशातील सर्वात मोठी निवासी घरांची बाजारपेठ! ‘नाइट फ्रँक इंडिया’चा अहवाल जाहीर
Bombil , Saranga, low visibility , fish price ,
कमी दृश्यमानतेमुळे मासळीही दिसेनाशी; यंदाच्या वर्षी सरंगा, बोंबिलाच्या दरात ७० टक्क्यांनी वाढ

हेही वाचा – शिवसेनेत फिरती मंत्रीपदे; इच्छुक, नाराजांना थोपविण्यासाठी शिंदे यांचा तोडगा

हेही वाचा – Kurla Bus Accident : क्लचऐवजी ॲक्सिलेटर दाबला? कुर्ला दुर्घटनेतील सर्वांत मोठी अपडेट समोर!

एमएमआरमधील घरांच्या किमतीत वाढ होत असतानाच मुंबई शहरातील घरांच्या किमतीतही वाढ होत आहे. मात्र टक्केवारीच्या तुलनेत ही वाढ काहीशी कमी आहे. वरळीतील घरांच्या किमती ३७ टक्क्यांनी वाढल्या आहेत. वरळीतील घरांची किंमत २०१९ मध्ये प्रती चौरस फूट ३८,५६० रुपये होती. ती २०२४ मध्ये २०१९ मध्ये ५३,००० रुपयांवर पोहचली. लोअर परळमधील घरांच्या किमतीत पाच वर्षांत ४९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. लोअर परळमधील घरांच्या किमती २०१९ मध्ये प्रती चौरस फूट ३४,६६० रुपये होती. ती २०२४ मध्ये प्रती चौरस फूट ५१,६६० रुपयांवर पोहोचली आहे. दरम्यान पनवेलमधील घरांच्या किमतीत अटल सेतू आणि नवी मुंबई विमानतळ प्रकल्पामुळे वाढ होत आहे. तर मागील काही वर्षांत वसई-विरारमध्येही पायाभूत सुविधांचा विकास झपाट्याने झाला आहे. विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका आणि इतर प्रकल्पांची उभारणी विरारमध्ये होणार आहे. त्यामुळे विरारमधील घरांच्या मागणीत पर्यायाने किमतीत वाढ झाल्याचे वाधवा वाईज सिटीजचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप सोनथालिया यांनी दिली.

Story img Loader