चेंबूरच्या स्वस्तिक पार्क येथे घरकाम करणाऱ्या महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. संगीता संतोष जाधव (३५) असे या महिलेचे नाव आहे.
स्वस्तिक पार्क येथील लीलाई अपार्टमेंटमध्ये प्रीती पारेख (४२) यांच्या घरी संगीता दोन वर्षांंपासून घरकाम करत होती. मध्यंतरी तिने काम सोडले होते. परंतु चार महिन्यांपूर्वी ती पुन्हा कामावर रुजू झाली होती. गुरुवारी सकाळी बाथरूममध्ये तिने दुपट्टयाने गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी तिने कोणतीही चिठ्ठी लिहून ठेवली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. कालपर्यत तिचे वागणे नेहमीसारखेच होते. तिच्या वागण्यात नैराश्य जाणवले नसल्याचे पारेख यांनी सांगितले.
आणखी वाचा