म्हाडाची घरे महाग असल्याने म्हाडाने स्वस्त घरांसाठी प्रयत्न सुरू केले असून पुणे, नाशिक आणि नागपूर येथेही जमिनी खरेदी केल्या आहेत. लवकरच तेथे स्वस्त घरे उभारली जाणार आहेत, अशी माहिती म्हाडाचे उपाध्यक्ष सतीश गवई यांनी दिली. दरम्यान, गिरणी कामगारांच्या घरांच्या दुसऱ्या टप्प्यातील घरे १८ ते २० लाखात मिळू शकतील असे सूतोवाचही त्यांनी केले.
सोमवारी म्हाडा पत्रकार संघाने आयोजित केलेल्या वार्तालापात म्हाडाचे गवई यांनी विविध विषयांवर म्हाडाची भूमिका मांडली. मुंबईत परवडणारी घरे बांधण्यासाठी म्हाडाकडे जमिनी शिल्लक राहिलेल्या नाहीत. त्यासाठी म्हाडा कायद्याच्या कलम ५२ चा उपयोग करून खाजगी जमिनी विकत घेण्यास सुरुवात केल्याचे ते म्हणाले. त्यानुसार पुणे, नागपूर आणि नाशिक येथे ६० एकर जमिनी म्हाडाने बाजारभावाने विकत घेतल्या आहेत. या ठिकाणी ५ ते ६ हजार स्वस्त घरांची निर्मिती होईल, असेही ते म्हणाले. औरंगाबादच्या देवळाई येथे १८ हेक्टर शासकीय जमीन म्हाडाला मिळाली असून तेथे बाराशे घरांची निर्मिती होईल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.
गिरणी कामगारांच्या घरांच्या दुसऱ्या टप्प्याचा कोनशिला कार्यक्रम दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडला. बांधकाम खर्चात ही घरे गिरणी कामगारांना देण्याचे सूतोवाच मुख्यमंत्र्यांनी केले होते. त्याबद्दल बोलताना गवई यांनी सांगितले की, सेंच्युरी मिलमध्ये रेडी रेकनर दराने बांधकाम खर्च ६३ लाख रुपये येणार आहे. परंतु म्हाडा ही घरे बांधेल तेव्हा १८ ते २० लाख रुपये खर्च येईल. म्हणजेच गिरणी कामगारांना या किमतीत ही घरे मिळू शकतील, असे त्यांनी अप्रत्यक्षरित्या सांगितल़े

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा