उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर यांनी फसवणूक कशी करावी, फ्रॉड कसा करावा? या सगळ्याची मोनोपली घेतली आहे. किशोरी पेडणेकर यांनी केलेले तीन करार खोटे आहेत. हे तिन्ही करार SRA संदर्भातले आहे. अनिल परब यांनी सदानंद कदमसोबत करार केला त्यांनीही असंच फ्रॉड, फोर्जरी आणि चिटिंग केलं आहे. संजय राऊत यांचे पार्टनर सुजीत पाटकर यांनीही हेच केलं आहे असे आरोप आज किरीट सोमय्यांनी केले आहेत. एवढंच नाही तर अशा व्यवहारांमध्ये बरबटलेल्या किशोरी पेडणेकरांना उद्धव ठाकरेंनी महापौरपद कसं दिलं? असाही प्रश्न किरीट सोमय्यांनी विचारला आहे.
मी देवेंद्र फडणवीसांना विनंती करणार आहे
मी आता देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली आहे की या तिघांकडे लक्ष द्या. फॉर्जरी करणं, खोटे करार करणं, लोकांना फसवणं हे करत आहेत. किशोरी पेडणेकरांनी लिव्ह अँड लायसन्स केलं आहे २०१७ मध्ये झालेलं आहे. हा करार कुणामध्ये झाला तर संजय महादेव अंधारी यांच्यासोबत. या करारावरची संजय अंधारी यांची सही खोटी आहे. फोर्जरी केल्याचं संजय अंधारी यांनीह कबूल केलं आहे असंही किरीट सोमय्यांनी म्हटलं आहे.
किशोरी पेडणेकर आणि उद्धव ठाकरे काहीही करू शकतात
असाच एक करार त्याच जागेचा हा किशोरी पेडणेकरांनी केला. किशोरी पेडणेकर आणि उद्धव ठाकरे हे काहीही करू शकतात. आत्ता जी चौकशी सुरू झाली त्यानंतर हा करार त्यांनी SRA आणि मुंबई महापालिकेला दिला. याच जागेचा अगदी तोच मजकूर २०१७ च्या करारातही आहे. या करारात काय लिहिलं आहे स्टँप पेपर नंबर ९४३३२२ दोन्ही पण संजय अंधारींसोबतच. दोन्ही खोटी आहेत असाही आरोप किरीट सोमय्यांनी केला. संजय अंधारी एकाच जागेचे २०१७ मध्ये एक करार करतात दुसरा करार १२ ऑगस्ट २०१७ सगळं तेच तेच या ठिकाणी आहे. एकाच जागेचे दोन करार कसे केले? असले चुकीचे करार करणाऱ्या उद्धव ठाकरेंनी महापौर कसं काय केलं? या दोन करांरांमध्ये एक खरे संजय अंधारी आहेत दुसरे खोटे संजय अंधारी आहेत जे किशोरी पेडणेकरांनी उभे केले आहेत. असंही किरीट सोमय्यांनी म्हटलं आहे.
गाळा कुणाचा, करार कुणासोबत? सगळं उद्धव ठाकरे जिंदाबाद
महापालिकेने गोमाता जनता एसआरए गाळा क्रमांक ५ कुणाला दिला आहे ? गंगाराम बोगा याला. तो आला आणि करार कुणी केला? यासंबंधीचा करार शिवप्रसाद तिवारी आणि किशोरी पेडणेकर यांच्यात झाला. कसा काय? ७ ऑगस्ट २०१२ ला करार झाला. गाळा देण्यात आला आहे मोगाला करार झालाय किशोरी पेडणेकर आणि तिवारी यांच्यात. करार झाला ऑगस्ट २०१२ मध्ये नोटरी केली २६ ऑगस्ट २०१३ ला. उद्धव ठाकरे जिंदाबाद म्हणून ही माफियागिरी करायची याचंच नाव उद्धव ठाकरे सेना. अशा व्यक्तींना उद्धव ठाकरे माफही करतात असाही आरोप किरीट सोमय्यांनी केला. यासंदर्भात किशोरी पेडणेकरांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी मी करणार आहे असंही किरीट सोमयांनी म्हटलं आहे.