मुंबईमधील ३६०० पैकी तब्बल १८०० मोबाइल टॉवर बेकायदा असल्याचे पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी दिवाळीच्या पूर्वसंध्येला जाहीर केले आणि मुंबईकर चक्रावले. आपल्या इमारतीवर उभारलेला मोबाइल टॉवर अधिकृत आहे की बेकायदा हे ओळखायचे कसे असा प्रश्न रहिवाशांना पडला आहे.
पालिकेच्या इमारत आणि कारखाने विभागाने हिरवा कंदिल दिल्यानंतर तो उभारता येतो. मात्र काही ठिकाणी अशी परवानगी न घेताच ते उभारण्यात आले आहेत. अधिकृत माबाइल टॉवरची पालिकेच्या विभागीय कार्यालयांमध्ये नोंदणी करण्यात आली आहे. उर्वरित टॉवर बेकायदा आहेत, असे पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. परंतु नागरिकांनी बेकायदा टॉवर कसे ओळखायचे, असे विचारले असता त्यावर त्यांनी कोणतीच प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.
आपल्या इमारतीवरील मोबाइल टॉवर अधिकृत असल्याची खातरजमा करण्यासाठी नागरिकांना पालिका कार्यालय गाठावे लागणार आहे. तेथे त्याची नोंदणी करण्यात आली नसेल तर तो बेकायदा असल्याचे स्पष्ट होईल. परंतु ही माहिती नागरिकांना सहजासहजी मिळणे अवघड आहे. प्रथम अर्ज करावा लागेल. संबंधित विभागाकडे अर्ज गेल्यानंतर तेथील अधिकाऱ्याने वेळेवर माहिती दिली तर ठिक अन्यथा कार्यालयात खेटे घालण्याशिवाय संबंधिताला गत्यंतर नाही.    
सर्वसामान्य संभ्रमात

Story img Loader