सुप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानीची सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. अनंत अंबानीने आपल्या नव्या रुपाने सर्वांना आश्चर्यचकीत केले आहे. आयपीएल स्पर्धेदरम्यान मुंबई इंडियन्स संघाचा संघ मालक अनंत अंबानी पॅव्हेलियनमध्ये एका मोठ्या सोफ्यावर बसलेला दिसायचा. लठ्ठपणामुळे अनंत अंबानीसाठी एका भल्यामोठ्या सोफ्याची व्यवस्था करावी लागत असे. पण आता अनंत अंबनीने तब्बल १०८ किलो वजन कमी करून सर्वांना सुखद धक्का दिला आहे. तेही केवळ १८ महिन्यांत त्याने ही किमया साधली आहे. आपल्या २१ व्या वाढदिवसापर्यंत वजन कमी करण्याचा अनंतने संकल्प केला होता. त्यासाठी त्याने गेल्या १८ महिन्यांत कठोर परिश्रम घेतले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

व्यायामाचे वेळापत्रक आणि आहार-
अनंत रोज ५ ते ६ तास व्यायाम करत असे. योगासनं झाल्यानंतर तो रोज तब्बल २१ किलोमीटर चालत असे. आहारावरही नियंत्रण ठेवले होते. साखर पूर्णपणे वगळली होती. आवश्यक त्या प्रमाणात स्निग्ध आणि प्रोटीनचा आहारात समावेश केला होता.

हृतिक रोशनच्या ट्रेनरकडून ट्रेनिंग-
बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशन ट्रेनिंग घेत असलेल्या अमेरिकेच्या सुप्रसिद्ध क्रिस गेथिनच्या देखरेखीखाली अनंतचे ट्रेनिंग सुरू होते. त्याने गुजराजच्या जामनगर येथील रिलायन्सच्या रिफायनरीमध्ये ट्रेनिंग घेतली. या ट्रेनिंगमध्ये गेले १८ महिने त्याने कठोर परिश्रम घेतले.

व्यायामासोबत योगासनांवरही भर-
दररोज पाच ते सहा तास व्यायामासोबतच त्याने योगासनांना देखील तितकेच महत्त्व दिले होते. कारण, केवळ व्यायामाने वजन कमी होणे शक्य नव्हते. योगासनांमुळे केवळ वजन कमी करण्याची नाही तर संपूर्ण शरीर निरोगी राखण्यासाठी मदत होते. त्यामुळे अनंतने योगासने देखील शिकली.

निता अंबानी खूश-
अनंतच्या परिश्रमावर आणि यशावर आई निता अंबानी देखील खूश झाल्या. त्यांनी आपल्या मुलाने घेतलेल्या परिश्रमांचे भरभरुन कौतुक केले. त्या म्हणाल्या, “अनंतचा निर्धार आणि इच्छाशक्ती ही इतरासांठी प्रेरणादायी आहे. अगदी माझ्यासाठीही.”