मुंबई: नवतंत्रज्ञानातून सेवेत सुलभता आणि सुखसोयी अनुभवास येत असल्या तरी लोकांना ठकवून लुबाडण्याचे प्रकारदेखील तितकेच वाढले आहेत. कष्टाने जमा केलेल्या पुंजीचे या सायबर धोके आणि ऑनलाइन फसवणुकीपासून संरक्षण ही आजची महत्त्वाची गरज झाली असून, त्या संबंधाने सुसज्जता आणि दाद-तक्रार कुठे व कशी करावी, याचे मार्गदर्शन ‘लोकसत्ता अर्थभान’ मालिकेतून येत्या रविवारी मिळविता येईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

गुंतवणूक साक्षरतेचा भाग म्हणून होत असलेला हा कार्यक्रम रविवारी, १५ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी १०.३० वाजता, सर्वेश हॉल, टिळक रोड, ताई पिंगळे चौक, डोंबिवली (पूर्व) येथे आयोजित करण्यात आला आहे. ‘आदित्य बिर्ला सन लाइफ मुच्युअल फंड’ या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक आहेत. उपस्थितांना गुंतवणुकीच्या नियोजनासह, सायबर धोक्यांच्या सापळ्यांविषयी त्यांच्या प्रश्न व शंकांचे निरसन करता येईल.

हेही वाचा : मंत्रिमंडळाचा आज विस्तार, नागपुरात शपथविधी; नावे गुलदस्त्यातच

घोटाळेबाजांकडून फसवणूक करण्यासाठी नवनव्या युक्त्या आणि नवनवीन सापळे रचले जात आहेत. सध्या भांडवली बाजाराशी संबंधित फसवणुकीच्या माध्यमातून लोकांचे सर्वाधिक नुकसान होत आहे. यातील आर्थिक नुकसानीची आकडेवारी भीतीदायक आहे. याचसाठी शेअर बाजार, बँका ते सोन्यानाण्यातील आपल्या गुंतवणुकीला सायबर घोटाळ्यापासून वाचवण्यासाठी आणि गमावलेला पैसा पुन्हा मिळवता येण्याचे मार्ग यासंबंधी परिपूर्ण माहिती या विशेष सत्रात आर्थिक नियोजनकार कौस्तुभ जोशी हे देतील. त्याचप्रमाणे शेअर गुंतवणूक अभ्यासक अजय वाळिंबे हे शेअर बाजार गुंतवणुकीची संरक्षक तटबंदी कशी असावी आणि आवश्यक नियोजन व दक्षता याबद्दल सांगतील.

पारंपरिक बँक ठेवींव्यतिरिक्त, म्युच्युअल फंड, शेअर बाजारात गुंतवणुकीच्या वाटांचे दिशादर्शन म्हणूनही हा कार्यक्रम उपस्थितांसाठी उद्बोधक ठरेल. कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य असून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य असेल.

हेही वाचा : जीटीबी नगर, सिंधी निर्वासितांच्या इमारतींचा पुनर्विकास ; पुनर्विकासासाठी दोन कंपन्या उत्सुक

वक्ते : कौस्तुभ जोशी (आर्थिक नियोजनकार)

विषय : स्मार्ट गुंतवणूक आणि फसवणुकीतून बचावाचे मार्ग

अजय वाळिंबे (शेअर गुंतवणूक अभ्यासक)

शेअर बाजार गुंतवणुकीची संरक्षक तटबंदी

कधी : रविवार, १५ डिसेंबर २०२४

वेळ : सकाळी १०.३० वाजता

कुठे : सर्वेश हॉल, टिळक रोड, ताई पिंगळे चौक, डोंबिवली (पूर्व)

अस्वीकरण: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे, सर्व योजना संबंधित कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा.