मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, कोल्हापूर.. असे करत करत महाराष्ट्रातील एकेक शहरे नागरीकरणाच्या लाटेवर स्वार झाली आहेत. राज्यात नागरीकरणाचा वेग वाढत आहे. मात्र, ही प्रक्रिया नियोजनपूर्वक व्हावी, अशी व्यवस्था सध्या तरी महाराष्ट्राच्या दृष्टिपथात नाही. नियोजनशून्य नागरीकरणाचे परिणाम राज्यातील जनता वेगवेगळय़ा माध्यमांतून भोगत आहे. या परिणामांचा आणि त्यावरील उपायांचा वेध ‘लोकसत्ता’ आणि ‘सारस्वत बँके’तर्फे सुरू झालेल्या ‘बदलता महाराष्ट्र’ या विशेष उपक्रमात घेण्यात येणार आहे. आज आणि उद्या (३० व ३१ ऑक्टोबर) मुंबईत होणाऱ्या ‘अर्धनागरीकरणाचे आव्हान’ नावाच्या या चर्चासत्रात विविध परिसंवादांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या बेछूट नागरीकरणाला लगाम लावण्याचा प्रयत्न केला जाईल. ‘उद्याच्या महाराष्ट्रा’च्या दिशा उजळणाऱ्या या उपक्रमाच्या दुसऱ्या भागात आर. आर. पाटील यांच्यापासून अजित गुलाबचंद, सतीश मगर, संजय भाटिया अशी नामवंत मंडळी नागरीकरणाच्या मुद्दयावर भाष्य करतील.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा