कल्याण रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक तीनवर गुरूवारी रात्री रामविलास यादव या फेरीवाल्याचे अन्य दोघांबरोबर भांडण झाले. या वादातून दुसऱ्या साथीदाराने रागाने रामविलासला ढकलून दिल्याने त्याचा तोल जाऊन तो रेल्वे मार्गावर पडला. त्याचवेळी एक लोकल तेथून गेल्याने रामविलासचा जागीच मृत्यू झाला.
याप्रकरणी नारायण हेडिंग या बदलापूर कात्रप येथे राहणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. अन्य एक जण फरार आहे. रेल्वे पोलिस ठाण्याचे साहयक पोलिस निरीक्षक निर्मल संपत यांनी सांगितले, कळवा येथे राहणारा रामविलास हा बदलापूर लोकलने काल रात्री कल्याण रेल्वे स्थानकावर उतरला. तेथे त्याचे नारायण बरोबर भांडण झाले. भांडण वाढत गेल्याने नारायणने रागाने रामविलासला फलाट क्रमांक तीनवरील रेल्वे मार्गावर त्याला ढकलले. त्याचवेळी तेथून मुंबईकडे जाणारी लोकल आल्याने रामविलासचा जागीच मृत्यु झाला. नारायणला अटक केली असून त्याच्या अन्य एका साथीदाराचा पोलिस शोध घेत आहेत.     

Story img Loader