महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीचा निकाल ३० मे रोजी लागणार असल्याची माहिती राज्य शिक्षण मंडळाने जाहीर केले आहे. ३० मे रोजी सकाळी ११ वाजता सर्व विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाईन उपलब्ध होईल. त्यानंतर १०-१५ दिवसांनंतर विद्यार्थ्यांना महाविद्यालयातूनच गुणपत्रिका मिळतील.
यावर्षी शिक्षकांच्या संपामुळे अनेक दिवस शिक्षण मंडळात विद्यार्थ्यांच्या उत्तपत्रिका पडून असल्यामुळे तपासणीचे काम लांबणीवर पडले होते. त्यामुळे निकाल नेहमीपेक्षा उशिरा लागत लागणार अशी शक्यता होती. मात्र सर्व विभागीय मंडळाचे बारावी पेपर तपासणीचे काम अंतिम टप्प्यात पूर्ण करून निकालाची तारीख आज (मंगळवार) घोषित करण्यात आली.
दहावीच्या परीक्षेच्या निकालाचे काम जवळपास अंतिम टप्प्यात असून जूनच्या दुसऱ्या आठवडय़ात तो जाहीर करण्याची शक्यता आहे. बारावी आणि दहावीचे निकाल लागल्यावर विद्यार्थ्यांच्या अ‍ॅडमिशनची प्रक्रिया लवकर सुरू होईल.

Story img Loader