अंदाजे ३५ बिबट्यांचा वावर मुंबईतील पश्चिम उपनगरांत असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान व वाईल्ड लाईफ इन्स्टीट्यूट ऑफ इंडिया यांनी संयुक्तपणे हे सर्वेक्षण केले आहे. डिसेंबर २०१४ ते एप्रिल २०१५ पर्यंतच्या कालावधीमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले होते.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये १०४ चौ.कि.मी च्या आवारात अंदाजे २१ बिबटे असल्याचे सांगण्यात येत आहे. तर, ५७ टक्के बिबटे हे वन्य जिवांची शिकार करून आपली भूक भागवतात. तर, प्रत्येकी १७ चौ.कि.मी. आवारातील २४ टक्के बिबटे आपली भूक भागवण्यासाठी शहरातील भटक्या कुत्र्यांना लक्ष्य करत असल्याची माहिती समोर आली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 30th Jun 2015 रोजी प्रकाशित
पश्चिम मुंबईच्या उपनगरांमध्ये ३५ बिबट्यांचा वावर
अंदाजे ३५ बिबट्यांचा वावर मुंबईतील पश्चिम उपनगरांत असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे.

First published on: 30-06-2015 at 05:06 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Httpindianexpress comarticlecitiesmumbaiaround 35 leopards roam mumbais western suburbs survey