मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने बीबीए, बीसीए, बीएमएस, बीबीएम अभ्यासक्रमाच्या अतिरिक्त सीईटीसाठी २९ जूनपासून नोंदणी प्रक्रिया सुरू केली असून या नोंदणी प्रक्रियेला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अवघ्या तीन दिवसांमध्ये तब्बल २० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी यासाठी नोंदणी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> राज्यात यंदा चार नवी वैद्यकीय महाविद्यालये सुरू होणार ?

बीबीए, बीसीए, बीएमएस, बीबीएम अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी यंदा प्रथमच सीईटी घेण्यात आल्याने अनेक विद्यार्थी परीक्षा देऊ शकले नाहीत. त्यामुळे विद्यार्थी, पालक आणि शैक्षणिक संस्थांनी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाला व्यक्तीश: भेट देऊन, मेल, दूरध्वनी, तसेच अर्जाद्वारे अतिरिक्त परीक्षा घेण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत उच्च व तंत्र शिक्षण विभागाने या अभ्यासक्रमाची अतिरिक्त सीईटी घेण्यास मंजुरी दिली होती. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन अतिरिक्त सीईटीसाठी २९ जूनपासून नोंदणी करण्यास सुरुवात करण्यात आली. २९ जून ते १ जुलै या तीन दिवसांमध्ये २० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने २९ मे रोजी बीबीए, बीसीए, बीएमएस, बीबीएम अभ्यासक्रमाची सीईटी घेतली होती. या परीक्षेसाठी एकूण ५६ हजार २४८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ४८ हजार १३५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यामुळे जवळपास ६० हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त राहण्याची शक्यता निर्माण झाली होती.