राज्यातील ५५६ अनुदानित आश्रमशाळांच्या विविध मागण्यांसाठी गेले तीन दिवस शाळांचे अधीक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आझाद मैदानात उपोषणाला बसले आहेत. अधीक्षक व वर्ग ४ कर्मचाऱ्यांना त्वरीत वरिष्ठ वेतन श्रेणी लागू करावी, सहा वर्षांपासून प्रलंबित असलेल्या एमएसडब्ल्यू अर्हताप्राप्त अनुदानित अधीक्षकांच्या प्रस्तावांना त्वरित मान्यता देण्यात यावी, दोन स्त्री अधीक्षकांची नेमणूक करावी, चौकीदार व सफाई कामगार भरण्यात यावे, मुख्याध्यापक व अधीक्षक यांच्या वेतनातील तफावत दूर करावी अशा १५ मागण्यांसाठी हे उपोषण आंदोलन सुरू आहे. पण तीन दिवस झाले तरी आदिवासी विकास विभागातील एकाही अधिकाऱ्याने उपोषणकर्त्यांची भेट घेतलेली नाही. आंदोलन सुरूच असून उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. राज्यातील आश्रमशाळा सुविधांअभावी हलाखीच्या परिस्थितीत आहेत. या प्रश्नांवर तोडगा काढणे आवश्यक आहे, अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष साहील तडवी यांनी केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा