माहेरी गेलेल्या पत्नीवर तिच्या पतीनेच गावठी गट्टयातून दोन गोळ्या झाडल्या. या गोळीबारात त्याची पत्नी थोडक्यात बचावली असून पती मात्र फरार झाला आहे. दहिसर पूर्वेच्या नवागाव चाळीत गुरुवारी संध्याकाळी ही घटना घडली. नवागाव येथील सोनाली (२४) हिचे पाच वर्षांपूर्वी काशिमिरा येथे राहणाऱ्या हरीश खरेशी लग्न झाले होते. त्यांना १३ महिन्यांची मुलगी आहे. लग्नानंतर सोनाली हरीशच्या काशिमिरा येथील घरी संयुक्त कुटुंबात राहत होती. हरीश चकाला येथे अकाऊंटट म्हणून काम करतो तर सोनाली अंधेरी येथील एका खाजगी रुग्णालयात प्रशासक म्हणून काम करते. परंतु हरीशच्या मद्यपान आणि सततच्या भांडणामुळे सोनाली आपले घर सोडून माहेरी आली होती. तिने हरीशविरोधात काशिमीरा पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती.
पत्नीवर गोळ्या झाडून पती फरार
माहेरी गेलेल्या पत्नीवर तिच्या पतीनेच गावठी गट्टयातून दोन गोळ्या झाडल्या. या गोळीबारात त्याची पत्नी थोडक्यात बचावली असून पती मात्र फरार झाला आहे. दहिसर पूर्वेच्या नवागाव चाळीत गुरुवारी संध्याकाळी ही घटना घडली.
First published on: 04-05-2013 at 02:31 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Husband absconds after after firing on wife in dahisar