धारावी येथे २४ वर्षीय विवाहितेच्या संशयास्पद मृत्यूनंतर पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला असून, पतीला अटक केली आहे. मृत महिलेच्या सासू-सासऱ्यांनाही आरोपी करण्यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

धारावी येथील शताब्दी नगर येथे रोशनीकुमार सरोज (२४) या विवाहितेने गळफास घेतल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला शनिवारी मिळाली. माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. त्यांनी महिलेला शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात नेले. तेथील डॉक्टरांनी महिलेला मृत घोषित केले. याप्रकरणी पोलिसांनी प्राथमिक तपासात महिलेचा गळा दाबण्यात आल्याचा संशय व्यक्त केला आहे. महिलेचे वडील सुरेशकुमार सरोज यांच्या तक्रारीवरून धारावी पोलिसांनी भादंवि कलम ३०२ अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा – भाजपचा ‘महाविजय संकल्प’ हा शिंदे गटाला इशारा?

हेही वाचा – गुलामगिरी नको असेल तर एकत्र यावेच लागेल; उद्धव ठाकरे यांची उत्तर भारतीयांना साद

तक्रारीनुसार, आरोपींनी हुंड्यासाठी त्यांच्या मुलीचा शारीरिक व मानसिक छळ केला. तसेच त्यांनी गळफास घेतल्याचा बनाव करून हुंड्यासाठी तिला जीवे मारले, अशी तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी महिलेचा पती कन्हैयालाल सरोज (२६), सासू विमलादेवी (४५) व सासरे अमरबहादूर (५२) याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पती कन्हैयालाल सरोज याला रविवारी अटक करण्यात आली आहे. धारावी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Husband arrested on charges of wife murder in dharavi mumbai print news ssb