मुंबईतील धारावी परिसरात पतीने पत्नी आणि तीन वर्षांच्या मुलीची गळा चिरुन हत्या केल्याची घटना समोर आली आहे. रियाज हुसेन असे या आरोपीचे नाव असून घरातून धूर आल्याने शेजारच्यांना हा प्रकार लक्षात आला आणि त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली.

धारावीतील डायमंड बिल्डिंगमध्ये रियाज हुसेन, त्याची पत्नी तेहसिन झोरा, मुलगी आलिया उर्फ फातिमा हे तिघे राहत होते. गुरुवारी सकाळी रियाजने आधी पत्नी तेहसिनची आणि मग तीन वर्षांच्या फातिमाची गळा चिरुन हत्या केली. यानंतर त्याने दोघांचे मृतदेह जाळले. मात्र, घरातून धूर येत असल्याचे स्थानिकांच्या लक्षात आले. त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली असता हा धक्कादायक प्रकार उघड झाला.

Story img Loader