कळवा येथील मफतलाल परिसरात सोमवारी सकाळी पतीने गरोदर पत्नीचा ओढणीने गळा आवळून खून केल्याचा प्रकार घडला. या प्रकारानंतर पती फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पत्नीने कामधंदा करण्यास सांगितल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून संतापलेल्या पतीने हा प्रकार केल्याचे पोलिसांनी सांगितले.
अजय उर्फ मुस्तफा आत्माराम जाधव उर्फ शेख (२५), असे पतीचे नाव असून कळवा येथील मफतलाल परिसरातील एकता चाळीत राहतो. तीन महिन्यांपुर्वी त्याने यास्मीन शेख (१९) हिच्यासोबत प्रेमविवाह केला. लग्नानंतर अजय काहीच कामधंदा करीत नव्हता. त्यामुळे या कारणावरून दोघेमंध्ये नेहमी भांडणे होत होती. दरम्यान, यास्मीन गरोदर असल्याने तिने अजयला कामधंदा करण्यास सांगितले. याच कारणावरून सोमवारी सकाळी त्यांच्यात भांडण झाले. त्यावेळी संतापलेल्या अजयने तिचा ओढणीने गळा आवळून खून केला. त्यानंतर त्याने तेथून पळ काढला. या प्रकरणी कळवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.     

Story img Loader