हैदराबादमधील स्फोटांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात हाय-अलर्ट जारी करण्यात आल्याची माहिती गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिली. हैदराबादमधील दिलसुखनगरमध्ये गुरुवारी संध्याकाळी सव्वासातच्या सुमारास दोन स्फोट झाले. 
महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक संजीव दयाळ यांनी स्फोटानंतर लगेचच महाराष्ट्रातील सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेतला आणि सर्वांना सावधानतेच्या सूचना दिल्या. महत्त्वाच्या शहरांतील संवेदनशील ठिकाणे, विमानतळे, मंत्रालय, मुंबईतील भाभा अणु संशोधन केंद्र येथील सुरक्षाव्यवस्था तातडीने वाढविण्यात आली.

Story img Loader