मुंबई : वधू-वर सूचक संकेतस्थळावरून संपर्क साधून महिलांची फसवणूक करणाऱ्या भामट्याला पायधुनी पोलिसांनी हैदराबाद येथून अटक केली. पायधुनी परिसरातील ४२ वर्षीय महिलेची आरोपीने २२ लाख रुपयांची फसवणूक केली होती. त्याप्रकरणी त्याच्याविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल होता. आरोपीने मुंबईतील १० ते १२ महिलांसह देशभरातील २० हून अधिक महिलांची फसवणूक केल्याचा संशय आहे. त्यात राज्यातील परभणी, धुळे व सोलापूर येथील महिलांचा समावेश आहे.

पायधुनी येथील राहणारी ४२ वर्षीय तक्रारदार व्यवसायाने शिक्षिका आहे. त्यांनी २०२३ मध्ये वधू-वर सूचक संकेतस्थळावर स्वतःची माहिती दिली होती. त्यावेळी संकेतस्थळाकडून काही मुलांची माहिती महिलेला देण्यात आली होती. त्यात हैदराबाद येथील इम्रानअली खान यांचीही माहिती होती. त्याद्वारे तक्रारदार महिलेने इम्रानशी संपर्क साधला असता त्याने आपण बांधकाम व्यवसायात कार्यरत असल्याचे सांगितले. त्याच्या आई-वडिलांचे निधन झाले असून तो मावशीसह हैदराबाद येथे राहतो. त्याचे दोन्ही भाऊ शिक्षणासाठी कॅनडामध्ये असल्याचे सांगितले. त्यावेळी दोघांनीही एकमेकांना पसंत केले. त्यानंतर १० मे २०२३ रोजी इम्रानने अचानक दूरध्वनी केला. त्यावेळी मित्रांना आपल्या बाबत सांगितले. त्यांना तुझ्याकडून पार्टी हवी आहे, असे सांगून इम्रानने एक हजार रुपये ऑनलाईन मागवून घेतले.

woman police officer stealing bananas from elderly women video viral on social media
स्कूटरवरून आली अन् वृद्ध महिलेला…, महिला पोलीस अधिकाऱ्याची भररस्त्यात दादागिरी? VIDEO पाहून नेटकऱ्यांचा संताप
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
Mangalsutra thief arrested thane, Mangalsutra thief,
ठाणे : महिलेला ढकलून मंगळसूत्र चोरणारा अटकेत
pimpri chinchwad cyber police busted gang operating through China, Nepal crime news
चीन, नेपाळमधून सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
BJP Party Worker Dead Body Found in Office
BJP Worker : भाजपा कार्यकर्त्याचा रक्ताने माखलेला मृतदेह कार्यालयात सापडल्याने खळबळ, महिला अटकेत; कुठे घडली घटना?
Mumbai woman lost rupees 6 lakhs
मुंबई : ऑनलाईन वस्तू विकणे महागात, महिलेला लाखोंचा गंडा
fake doctor defrauded old woman
मुंबई: तोतया डॉक्टरकडून शस्त्रक्रियेच्या नावाखाली वयोवृद्ध महिलेची लाखोंची फसवणूक
woman frouded elder woman by forced to deposit money in verious accounts
लंडनमधील मैत्रिणीकडून वयोवृद्धाची लाखोंची फसवणूक

हेही वाचा…लीलावती रुग्णालयामध्ये ५०० कोटींचा आर्थिक घोटाळा, नवनिर्वाचित विश्वस्त मंडळाद्वारे घोटाळा उघडकीस

काही दिवसांनी तक्रारदार महिलेने आईला भेटण्यासाठी मुंबईत येण्यास सांगितले. त्यावेळी आपले पैसे अडकले असल्याचे सांगून मुंबईत येण्यासाठी महिलेकडून १० हजार रुपये मागवून घेतले. मुंबईत काही दिवस राहिल्यानंतर आरोपीने भायखळा येथे एक भूखंड खरेदी करायचा असून त्यासाठी महिलेकडून १५ लाख रुपये घेतले. त्यानंतर वन विभागाची जमीन खरेदी केल्याप्रकरणी पोलिसांनी आपल्याला अटक केली असून त्या जामिनासाठी व इतर गोष्टींसाठी आरोपीने आणखी रक्कम घेतली. तक्रारदार महिलेने एकूण २१ लाख ७३ हजार रुपये आरोपीला दिले. ही रक्कम आरोपीने परत न करता महिलेची आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर पायधुनी पोलिसांनी आरोपी इम्रान अली खान याला हैदराबादमधून अटक केली. आरोपीविरोधात यापूर्वीही गुन्हे दाखल असून त्यात हत्येच्या गुन्ह्याचाही समावेश असल्याचे सूत्रांनी सांगितले. आरोपीचे यापूर्वी लग्न झालेले असून त्याच्या पत्नीने कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा त्याच्याविरोधात दाखल केला होता.

हेही वाचा…मुंबई : यंदा पावसाळ्यात २२ वेळा ४.५ मीटर उंचीच्या लाटा उसळणार

मुंबईसह देशभरातील महिलांची फसवणूक

आरोपीने मुंबईतील १० ते १२ मुलींसह राज्यातील परभणी, धुळे सोलापूर येथली महिलांची फसवणूक केल्याचा संशय आहे. त्याशिवाय या भामट्यान कोलकाता, लखनऊ, दिल्ली व देहरादून येथील महिलांनाही आरोपीने फसवल्याचा संशय असल्याचे सूत्रांनी सांगितले. आरोपीच्या मोबाईल क्रमांकामध्ये आरोपीने या महिलांशी संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.