छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर सीमाशुल्क विभागाने केलेल्या कारवाईत साडेचार किलो हेरॉईन जप्त करण्यात आले असून त्याची किंमत २२ कोटी रुपये आहे. या कारवाईत हैदराबादमधील रहिवाशाला अटक करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली. दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथून हेरॉइनची तस्करी करण्यात आली असून हे अंमलीपदार्थ दिल्लीतील एका परदेशी नागरिकाला देण्यात येणार होते. पण तत्पूर्वीचे ते सीमाशुल्क विभागाच्या हाती लागले.

हेही वाचा >>> मुंबई:लटकता प्रवास धोक्याचा; रुळांजवळील खांबांची धडक बसून ७५ प्रवाशांचा अपघात

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

सीमाशुल्क विभागाच्या हवाई गुप्तवार्ता विभागाने (एआययू) ही कारवाई केली. हेरॉईन भारतात आणण्यात येणार असल्याची माहिती एआययूच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे एआययूच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी संध्याकाळी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका आंतरराष्ट्रीय विमान प्रवाशाला ताब्यात घेतले. फैजल साबर असे त्या व्यक्तीचे नाव असून तो हैदराबाद येथील रहिवासी आहे. त्याच्याकडील काळ्या रंगाच्या ट्रॉली बॅगची तपासणी करण्यात आली असता त्यात १२ संशयीत पाकीटे सापडली. त्याची तपासणी केले असता पांढऱ्या रंगाची संशयीत भुकटी सापडली. तपासणीत ती भुकटी हेरॉईन असल्याचे निष्पन्न झाले. १२ पाकिटांमध्ये ४५०० ग्रॅम हेरॉईन सापडल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. आंतरराष्ट्रीय बाजारात या हेरॉईनची किंमत २२ कोटी रुपये आहे.

हेही वाचा >>> मुंबई : महानगरपालिका आयुक्तांनी ‘मार्ड’च्या पदाधिकाऱ्यांना दिली केवळ एका मिनिटाची भेट

दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथील एका महिलेने त्याला हे अंमलीपदार्थ दिले होते. दिल्लीतील एका परदेशी नागरिकाला हेरॉईन द्यायचे होते. पण त्यापूर्वीच त्याला अटक करण्यात सीमाशुल्क विभागाला यश आले. आरोपीविरोधात अंमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला या तस्करीसाठी रक्कम देण्यात येणार होती. यापूर्वीही त्याने अशा प्रकारे अंमलीपदार्थांची तस्करी केली आहे का, याबाबत अधिकारी तपास करीत आहेत. याप्रकरणी दिल्लीतही शोध मोहीम राबवण्यात आली असून आरोपीच्या संपर्कात असलेल्या संशयीतांचा शोध सुरू आहे.

Story img Loader