शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात अत्यंत अपमानित अवस्थेत व्यासपीठ सोडायला लागल्यानंतर चार दिवस अज्ञातवासात गेलेले शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी ‘मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफले उचलणार नाही,’ या थाटात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना गुरुवारी पत्र लिहिले. हे पत्र खासगी असल्याचे सरांनी म्हटले असले तरी त्यात ‘मी कोणतीही चूक केली नाही’ असे त्यांनी उद्धव यांना सांगितल्याचे समजते.
मनोहर जोशी यांनी उद्धव यांना पत्र लिहून माफी मागितल्याचे वृत्त सेनेच्या गोटातून पेरण्यात आले होते. खंडाळ्याहून परतलेले मनोहर जोशी यांनी, ‘आपण उद्धव यांना पत्र लिहिले होते. मात्र ते खासगी असल्यामुळे त्याचा तपशील देता येणार नाही’, असे सांगितले. त्याचवेळी या पत्रात दसरा मेळाव्यापूर्वी झालेल्या घटनाक्रमाचे केवळ सत्य आपण सांगितले असून मी कोणतीही चूक केलेली नसल्याचे म्हटले आहे. ‘मातोश्री’ हे माझ्याकरता मंदिर असून मला बोलावले तर तेथे जाणारच; परंतु नाही बोलावले तरीही जाणार, असेही ते म्हणाले.
मी चूक केली नाही!
शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात अत्यंत अपमानित अवस्थेत व्यासपीठ सोडायला लागल्यानंतर चार दिवस अज्ञातवासात गेलेले शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी ‘मी शेंगा खाल्ल्या नाहीत,
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 19-10-2013 at 02:32 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I did not committed any mistake manohar joshi