ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचा सवाल
देशात दलितांवर, स्त्रियांवर अत्याचाराच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत, मात्र त्यावर निषेधाचा एकही शब्द न उच्चारणाऱ्यांना गेल्या आठ-दहा महिन्यांत देशात अचानक असहिष्णुता वाढत असल्याचा साक्षात्कार होत आहे, अशा शब्दात ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी असहिष्णुतेसंदर्भात बोलणाऱ्यांचा समाचार घेतला. कुठे दिसते असहिष्णुता, असा रोकडा सवाल करतानाच त्यांनी या वेळी पुरस्कार परत करणाऱ्या साहित्यिक-कलावंतांवरही जोरदार टीका केली.
‘सर्वकार्येषु सर्वदा’ या दानयज्ञाद्वारे आतापर्यंत ‘लोकसत्ता’च्या वाचकांशी जोडल्या गेलेल्या ५१ संस्थांचा स्नेहमेळावा दादर येथील स्वा. सावरकर स्मारक येथे मंगळवारी पार पडला. या कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या हस्ते २०१५च्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ या उपक्रमातील दहा संस्थांना धनादेश सुपूर्द करण्यात आले. तसेच सर्व ५१ संस्थांचा परिचय करून देणारे ‘लोकसत्ता ग्रंथमाले’तील ‘सर्वकार्येषु सर्वदा’ या पहिल्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी डायमंड प्रकाशनचे दत्तात्रय पाष्टे यांचाही सत्कार करण्यात आला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I have not seen intolerance says vikram gokhale